कमला मिल अग्नितांडव : महापालिकेचे 5 अधिकारी निलंबित

कमला मिल अग्नितांडव : महापालिकेचे  5 अधिकारी निलंबित

लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोसला आग लागली होती. ही आग एवढी भीषण होती की, मोजोसच्या बाजूलाच असलेलं लंडन टॅक्सी हे रेस्टॉरंटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं.

  • Share this:

29 नोव्हेंबर:  मध्य रात्री  कमला मिलमध्ये लागलेल्या आगीवरून पाच अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय.   तर स्थानिक  वॉर्ड ऑफिसर प्रशांत सपकाळे यांची बदली करण्यात आली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोसला आग लागली होती. ही आग एवढी भीषण होती की, मोजोसच्या बाजूलाच असलेलं लंडन टॅक्सी हे रेस्टॉरंटही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. या आगीत गुदमरून 1४ जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री 12.30 वाजताच्या दरम्यान हॉटेल मोजोसमध्ये ही आग लागली. बघता बघात आग वाऱ्यासारखी पसरली. आजूबाजूचा परिसरही आगीच्या विळख्यात सापडला. आगीच्या घटनेमुळे कमला मिल कंपाऊंडमधील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. हॉटेल मोजोसला लागलेल्या भीषण आगीमुळे रेस्टॉरंट आणि पबचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जवळच असलेल्या हॉटेल लंडन टॅक्सीपर्यंत या आगीचे लोळ पोहोचले  आणि  हॉटेल लंडन टॅक्सीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. कमला मिलमधल्या हॉटेल लंडन टॅक्सीच्या टेरेसवर पब आहे. या आगीमुळे हॉटेल लंडन टॅक्सीचंही नुकसान झालं आहे.

याप्रकरणी हलगर्जीपणा  केल्याप्रकरणी महापालिकेने खालील 5 अधिकाऱ्यांचं निलंबन केलं आहे.

 नाव                         पद

मधुकर शेलार           पदनिर्देशित अधिकारी

धनराज शिंदे             ज्युनिअर इंजिनियर

महाले                        सब इंजिनिअर

पडगिरे                     वैद्यकीय आरोग्य अधिकारी

एस. एस. शिंदे          अग्निशमन अधिकारी

 याशिवाय वॉर्ड साऊथ ऑफिसर प्रशांत सपकाळे यांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी सरकार अत्यंत कडक कारवाई करणार आहे हे आता स्पष्ट दिसतं आहे. दरम्यान पाचही अधिकाऱ्यांवर आम्ही कारवाई करू  असं वक्तव्य मुंबईचे महापौर सुनील महाडेश्वर यांनी केलं आहे. तसंच याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

या मुद्द्यांवर झाली स्थायी समितीत चर्चा 

- विधी विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे

- अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना केवळ नोटीसा दिल्या जातात

- विधी विभाग कारवाई करत नाही

- विधी विभागातील अधिकारी तक्रारी दाबून ठेवतात

- आयुक्तांनी प्रलंबित प्रकरणांची माहिती घ्यावी आणि त्या सर्वांवर कारवाई करावी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2017 05:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading