S M L

नवी मुंबईतील बेपत्ता झालेली पाच मुलं या स्थानकावर सापडली

Updated On: Sep 6, 2018 04:28 PM IST

नवी मुंबईतील बेपत्ता झालेली पाच मुलं या स्थानकावर सापडली

नवी मुंबई, 06 सप्टेंबर : नवी मुंबईतून बेपत्ता झालेली पाच मुले सापडली आहेत. मुंबईच्या सीएसएमटी स्थानकात ती सापडली. एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना ही मुले प्लॅटफॉर्मवर सापडली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे हे पाच जण मुंबई फिरायला गेले होते. याबद्दल त्यांनी घरच्यांना काहीही कल्पना दिली नव्हती. त्यामुळे काल दुपारपासून संपूर्ण आदिवासी पाडा या मुलांचा शोध घेत होती. सीएसएमटी स्थानकात सापडलेल्या या मुलांना ताब्यात घेण्यासाठी नवी मुंबई पोलीस रवाना झाले आहेत.

रबाळे येथील 5 शाळकरी मुले बेपत्ता झाली होती. काल दुपारी ही 5 मुलं बेपत्ता झाली होती. ही पाचही मुले रबाळेमधील आदिवासी कातकरी पाड्यामधील राहणारे विद्यार्थी आहेत. ही पाचही मुलं एकाच शाळेत शिकणारी आहेत. इयत्ता दुसरी ते सहावीमधील शिकणारे हे विद्यार्थी आहेत.

बेपत्ता झालेल्या 5 मुलांची नावे

1) शंकर तेजवंत सिंह, वय 11

2) गगन तेजवंत सिंह, वय 8 (दोघंही भावंड आहेत.)

Loading...

3) अर्जुन ढमढेरे, वय 11

4) रोहित जैस्वाल, वय 13

5) अनिस आदिवासी, वय 11

काल दुपारी रबाळेमधील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयातील हे 5 विद्यार्थी शाळेजवळ खेळत होती. दुपारी 1 वाजता अचानक ही मुलं दिसेनाशी झाली. त्यानंतर त्यांचा आदिवासी पाड्यातील सगळ्यांनी त्यांचा शोध घेतला पण ही मुलं कुठेही सापडली नाही. या मुलांना बेपत्ता होऊन आता 24 तास उलटून गेले होते. याची माहिती माध्यमांना मिळताच ही मुलं बेपत्ता असल्याचं सगळीकडे पसरलं आणि त्यावरून एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं आहे.

रात्रभर वस्तीतील लोकांनी या मुलांना शोध घेतला पण ती त्यांचा काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी आज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याच्यावर पोलीस फौजही या मुलांना शोधण्यासाठी कामाला लागली होती.

VIDEO: दाभोलकरांवर गोळ्या झाडल्यानंतर अंदुरे, कळसकर कसे गेले पळून ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 6, 2018 04:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close