पावसाची कमाल, परळमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला मासा

पावसाची कमाल, परळमध्ये साचलेल्या पाण्यात सापडला मासा

परळच्या हिंदमाता इथं साचलेल्या पाण्यात एक मोठा मासा आढळून आला आहे.

  • Share this:

30 आॅगस्ट : मुंबईत पावसाचं पाण्यात आता अजब गोष्टी सापडत आहेत. परळच्या हिंदमाता इथं साचलेल्या पाण्यात एक मोठा मासा आढळून आला आहे.

मुंबईतील हिंदमाता परिसरात सखल भाग असल्यामुळे पाणी साचले होते. पाणी साचल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. आज सकाळी लोकांना या पाण्यात अजब गोष्टी सापडत आहे. सकाळी एका शंभू नावाच्या व्यक्तीला पाण्यात चक्क मासा सापडला.   या ठिकाणाजवळच एक मच्छी मार्केट आहे. तिथलच्या एखाद्या दुकानातून हा मासा पावसाच्या पाण्यात आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, हा मासा तिथलाच आहे अशी कोणताही माहिती कळू शकली नाही. दरम्यान, मुसळधार पावसामुळे विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर मगर रस्त्यावर आली होती. त्यानंतर आता पाण्यातच मासे सापडत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2017 11:19 AM IST

ताज्या बातम्या