मुंबईत देशाचं पहिलं विदेश भवन सुरू;सुषमा स्वराज यांनी केलं उद्घाटन

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथं उभारण्यात आलेल्या या विशाल भवनात पहिल्या योजनेअंतर्गत चार कार्यालये असणार आहेत. क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय , प्रवासी संरक्षक कार्यालय , शाखा सचिवालय ,आईसीसीआरचे क्षेत्रीय कार्यालय या कार्यालयांचा यात समावेश आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 28, 2017 11:57 AM IST

मुंबईत देशाचं पहिलं विदेश भवन सुरू;सुषमा स्वराज यांनी केलं उद्घाटन

मुंबई,28 ऑगस्ट: देशातल्या पहिल्या विदेश भवनाचं उद्घाटन रविवारी मुंबईत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते झालं. आता परराष्ट्र विभागाची सर्व कामं एकाच छताखाली करणं शक्य होणार आहे.

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथं उभारण्यात आलेल्या या विशाल भवनात पहिल्या योजने अंतर्गत चार कार्यालयं असणार आहेत. क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय , प्रवासी संरक्षक कार्यालय, शाखा सचिवालय, आईसीसीआरचे क्षेत्रीय कार्यालय या कार्यालयांचा यात समावेश आहे. ज्या तरूणांना विदेशात नोकरी हवी आहे त्यांचं काउन्सिलिंगही इथे केलं जाईल अशी माहिती सुषमा स्वराज यांनी यावेळी दिली. तसंच गेल्या सहा महिन्यात 235 नवीन पासपोर्ट केंद्र उघडल्याची माहिती यावेळी स्वराज यांनी दिली.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र राज्य मंत्री जनरल व्ही के सिंग , मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2017 11:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...