S M L

मुंबईत महाकाय टनेल बोरिंग मशीन दाखल, मेट्रोसाठी करणार भुयारी मार्ग !

भुयारी असणाऱ्या या प्रकल्पासाठी भुयार खोदणारं तबल 110 मी लांबीच टनेल बोरिंग मशीन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूगर्भात उतरवण्यात आलंय

Sachin Salve | Updated On: Sep 21, 2017 09:30 PM IST

मुंबईत महाकाय टनेल बोरिंग मशीन दाखल, मेट्रोसाठी करणार भुयारी मार्ग !

मंगेश चिवटे, मुंबई

21 सप्टेंबर : कुलाबा - बांद्रा - सिप्झ या मेट्रो मार्ग 3 साठी पहिलं टनेल बोरिंग मशीन आज भूगर्भात उतरवण्यात आलीये. संपूर्णत भूमिगत असणाऱ्या मेट्रो 3 च्या कामाला आता आणखी वेग येणार आहे.

कुलाबा - बांद्रा - सिप्झ हा मेट्रो 3 प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी अगदी मध्यरात्रीही भेट देऊन कामाची पाहणी करतात. संपूर्णत: भुयारी असणाऱ्या या प्रकल्पासाठी भुयार खोदणारं तबल 110 मी लांबीच टनेल बोरिंग मशीन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूगर्भात उतरवण्यात आलंय. यावेळी त्यांनी मेट्रो 3 प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याचा दावा करतं, या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर लोकलच्या गर्दीपासून आणि रस्त्यावरील ट्रॅफिक पासून सुटका होण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. मेट्रो 3 प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करणार असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

दरम्यान, मेट्रो ही काळाची गरज असून ऑक्टोबर महिन्यात टनेल बोरिंग मशीनच्या माध्यमातून भुयारीकरणांस सुरुवात होणार असल्याचे मेट्रो 3 प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी सांगितलं.

एकूणच मेट्रो 3 या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या भुयारीकरण्याच्या कामाला आता प्रत्यक्षत सुरुवात होणार आहे. मात्र कामाच्या पुर्ततेची दोनवेळा डेडलाईन पुढे ढकलण्यात आलेला हा प्रकल्प 2021 च्या नव्या डेडलाईनपर्यंत पूर्ण करणं हे एक मोठं आव्हान असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 21, 2017 09:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close