मुंबई, 26 ऑक्टोबर : आर्यन खान अटक प्रकरणी (Aryan Khan arrest case) एकीकडे मुंबई हायकोर्टात (mumbai high court) सुनावणी सुरू होती तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांची भेट घेतली. यावेळी मलिक यांनी या प्रकरणी एसआयटी (sit) चौकशीची मागणी केली असून लवकरच एफआयआर दाखल होणार, असल्याची माहिती दिली.
नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान अटक प्रकरणावरून एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर एकापाठोपाठ आरोपांची मालिका लावली आहे. या प्रकरणी पहिल्यांदाच मलिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलत असताना मलिक यांनी महत्त्वाची माहिती दिली.
'मी परभणी आणि नांदेडच्या दौऱ्यावर असता क्रुझ ड्रग्स प्रकरणा एका पंचाने प्रतिज्ञापत्र सादर करून धक्कादायक खुलासा केला होता. हे प्रकरण अंत्यत गंभीर आहे. या प्रकरणी एसआयटीच्या मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली. या प्रकरणाचा तपास करून गुन्हा दाखल केला जाणार आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर अनेक बाबी उघड होतील, असा दावा मलिक यांनी केला.
तसंच, या प्रकरणी एफआयआर हा खंडणी प्रकरणात दाखल होईल. पंचानी जो काही खुलासा केला आहे, कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणी ही गंभीर घटना असून अनेक तक्रारी समोर आल्याचं सांगितलं आहे, असंही मलिक म्हणाले.
'बॉलिवूडही मोठी इंडस्ट्री आहे. त्यावर लाखो लोकांची घर चालत आहे. त्याचा जीडीपीमध्ये वाटा आहे. फक्त अभिनेत्यांवर संशय घेऊन कारवाई करण्यात आली त्यामुळे बॉलिवूडची बदनामी झाली आहे. या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाठवणार आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.
'समीर वानखेडे यांनी खोटे जातप्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवली असा आमचा आरोप आहे. अनेक दलित संघटनांनी आमच्याकडून पुरावे मागितले आहे. हे पुरावे घेऊन जात पडताळणी संस्थेकडे जाणार आहे. त्यांचे जातप्रमाणापत्र हे बनावट असून ते तपासातून समोर येईल, असा दावाही मलिक यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.