मनोज कुलकर्णी, प्रतिनिधी
चेंबूर, 03 मार्च : शिक्षणातील पहिला टप्पा समजल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. वर्षभरापासून तयारी करून बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थी सामोरं जात आहे. परंतु, मुंबईतील चेंबूर परिसरात एका विद्यार्थ्यांवर डोक्यावर छत्र हरपले तरीही पहिली परीक्षा दिली नंतर वडिलांना मुखाग्नी दिला.
चेंबूरच्या टिळकनगरमधील पंचशील नगरमध्ये परमेश्वर साळवे (वय 40) हे आपले आईवडील पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. परमेश्वर हे हाऊस किपिंगचं काम करत होते. पत्नी घरकाम करते तर मुलगा संदेश 10 वीला शिकतो.
परमेश्वर यांना दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. पण सोमवारी रात्री 9 वाजेच्या दरम्यान त्यांचं निधन झालं. मंगळवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. सकाळी मात्र त्यांच्या मुलगा संदेश याची दहावीची परीक्षा सुरू होत असल्याने आज पहिला पेपर आहे. परीक्षा देऊन आल्यावर अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला आपल्या आजोबाला दिला त्यांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी हा सल्ला एकाला. सर्वांनी संदेशच्या शिक्षणाला प्राधान्य देत असत्यसंस्कार 3 वाजता करण्याचे ठरवलं. संदेश अडीच वाजता पेपर देऊन आल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अडीच वाजता पेपर देऊन आल्यावर अंत्यसंकार करण्यात आले. झाली घटना ती तर झाली पण पेपर दिला नसता तर मात्र वर्ष वाया गेलं असतं हा विचार करून शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला.
आपल्या दुःखाच्या घटनेत सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करून शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून देण्यात संदेश यशस्वी झाल्याने सर्वच स्तरातून संदेश कौतुकही होत आहे.
दहावीचा मराठीचा पेपर फुटला, Whatsapp वर प्रश्नपत्रिका VIRAL
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहवीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी दहावीचा भाषा (मराठी)विषयाचा पेपर फुटल्यानं खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याची माहिती मिळत आहे. हा पेपर परीक्षेआधीच व्हॉट्सअॅपवर आल्यानं खळबळ उडाली. या घटनेची तक्रार दाखल केली असता केंद्र प्रमुखांनी शिक्षण मंडळाचे सचिव नितीन उपासनी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत दुर्लक्ष केलं आहे. तालुक्यातील एकाच केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपीबहाद्दरांचा सुळसुळाट आहे. पहिल्याच दिवशी अशा प्रकारे कॉपी सापडल्यानं खळबळ उडाली आहे.
राज्यातील 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. ही परीक्षा 03 मार्च ते 23 मार्चपर्यंत होणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत होत आहेत. 9045 दिव्यांग विद्यार्थ्यांचाही समावेश असणार आहे. कॉपी आणि इतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्यभरात 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. मार्च 2020 पासून 80 गुणांची लेखी 20 गुणांची तोंडी परीक्षा होणार आहे. 10 वीची परीक्षा देण्यासाठी गेल्यावर्षी पेक्षा यंदा 65 हजार 25 विद्यार्थी संख्या जास्त असल्याचंही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे.