S M L

भारतीय बनावटीचं पहिलं विमान लवकरंच आकाशात झेपावणार

अमोल यादव यांच्या प्रयत्नांमुळे येत्या 4 महिन्यात भारतीय बनावटीचं पहिलं विमान आकाशात झेपावणार आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 19, 2017 09:13 AM IST

भारतीय बनावटीचं पहिलं विमान लवकरंच आकाशात झेपावणार

मुंबई,19 सप्टेंबर: भारतीय एअरलाईन्स अनेक आहेत, पण भारतीय बनावटीचं विमान अजूनपर्यंत बनलेलं नाही. पण हे चित्र आता लवकरच बदलणार आहे, अमोल यादव यांच्या प्रयत्नांमुळे येत्या 4 महिन्यात भारतीय बनावटीचं पहिलं विमान आकाशात झेपावणार आहे.

भारतात बनलेल्या या पहिल्या विमानाचं नाव टीएसी झीरो फाईव्ह आहे.या विमानाचा पहिला लूक त्यांनी नुकताच माध्यमांसमोर आणला.

पुढच्या 4 महिन्यांत भारतात असं एक विमान उडेल जे भारतातच बनलेलं असेल. त्याच्यामागे आहेत पायलट अमोल यादव. विमानाचं नाव आहे झीरो फाईव्ह. यादवांनी आज मुंबईत त्याचा पहिला लूक माध्यमांसमोर आणला. या विमानात 19 प्रवाशांना बसता येणार आहे. प्रॅट अँड व्हीआईटनी या कंपनीचं पीपी सिक्स ए इंजिन यात लावलंय. डिसेंबरपर्यंत ते उडण्यासाठी सज्ज असेल असं यादवांनी सांगितलं आहे.

भारतीय बनावटीचं विमान असावं असं यादवांचं स्वप्न होतं. ते मुळचे साताऱ्याचे रहिवासी आहेत. आता या 19 सीट्सच्या विमानामुळे छोट्या शहरांनाही विमानसेवा मिळेल. सध्या जी विमानं छोट्या शहरांमध्ये जातात, ती किमान 70 सीटर असतात. अनेक वेळा सगळ्या सीट्स जात नाहीत. मग काही दिवसांनी सेवाच बंद होते. मेक इन महाराष्ट्रच्या प्रदर्शनादरम्यान यादव यांचा हा अविष्कार जगासमोर आणला. सध्या ते आपल्या इमारतीच्या गच्चीवरच हे विमान बनवत आहेत. पण सरकारनं त्यांना पालघरला जागा देण्याचं आश्वासन दिलं आहे.

अनेक देशांनी यादवांसमोर प्रस्ताव ठेवले होते.. पण यादवांनी निश्चय केला होता, विमान बनवील तर भारतातच, तेही माझ्या महाराष्ट्रात. त्यांचं विमान आता कधी झेपावतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 09:13 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close