Home /News /mumbai /

#BREAKING कोरोना व्हायरसचा मुंबईत पहिला बळी, 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

#BREAKING कोरोना व्हायरसचा मुंबईत पहिला बळी, 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. सध्या कोरोना रुग्णांची संख्या 39वर पोहोचली आहे.

    मुंबई, 17 मार्च : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने भारतातही वेगाने प्रवेश केला. भारताची आर्थिक राजधानीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. आता कोरोनामुळे मुंबईत पहिला मृत्यू झाला आहे. मुंबईतील 64 वर्षीय रुग्णाचा कस्तुरबा गांधी रुग्णालयात मृत्यू झाला. दुबईहून आलेल्या या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्वरित कस्तुरबा दाखल करण्यात आले होते. मात्र आता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती घाटकोपर स्थायिक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या व्यक्तीला इतरही आजर असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत झालेल्या या पहिल्या मृत्यूनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्वरित बैठक बोलवली आहे. मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णाला 8 मार्च रोजी तब्येत बिघडल्यामुळे हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी ते दुबईवरून भारतात आले होते. तब्येत बिघडल्यमुळे लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवस त्यांच्य प्रकृतीत सुधार न झाल्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. 12 मार्च रोजी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना काही काळ वेगळे ठेवण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधार न झाल्यामुळे आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे आता भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. याआधी दिल्ली आणि कर्नाटकातील वयोवृद्ध व्यक्तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.कोरोनाला बळी पडलेले तीनही रुग्ण 60 वर्षांच्या वरील वयोगटातील असल्यामुळे हा आजाराचा धोका वयस्करांमध्ये जास्त असल्याचे दिसत आहे. भारतात कोरोनाचा तिसरा बळी याआधी 29 फेब्रुवारी रोजी कोरोनाचा पहिला बळी भारतात झाला होता. कर्नाटकातील 76 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर काही दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. ते आपल्या कुटुंबियांसमवेत सौदी अरेबियाला फिरायला गेला होते. त्यांच्या पत्नी आणि मुलगाही कोरना पॉझिटिव्ह आढळून आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, 13 मार्च रोजी 68 वर्षीय महिलेचा दिल्लीत मृत्यू झाला होता. आता मुंबईतील मृत्यूने हा आकडा तीन झाला. मृतांचा आकडा वाढल्यामुळे सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात 1063 प्रवासी दाखल राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण 1063 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात 794 जणांना भरती करण्यात आले आहे. भरती करण्यात आलेल्यांपैकी 717 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 39 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या