मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णाची पत्नी आणि मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईत मृत्यू झालेल्या रुग्णाची पत्नी आणि मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाव्हायरसमुळे मुंबईत पहिला मृत्यू झाला आहे.  भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.

कोरोनाव्हायरसमुळे मुंबईत पहिला मृत्यू झाला आहे. भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.

कोरोनाव्हायरसमुळे मुंबईत पहिला मृत्यू झाला आहे. भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
मुंबई, 17 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे मुंबईत पहिला मृत्यू झाला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 64 वर्षीय करोनाग्रस्त रुग्णाचं निधन झालं आहे. यामुळे आता भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. दुबईहून आलेल्या या व्यक्तिवर कस्तुरबा रुग्णालयात गेले काही दिवस उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांचं निधन झालं. ही व्यक्ती घाटकोपरला वास्तव्यास होती, अशी माहिती मिळत आहे. मुख्य म्हणजे या मृत रुग्णाच्या पत्नी आणि मुलगाही कोरना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्या सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 39वर पोहोचली आहे. केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेशमध्ये नवे रुग्ण सापडल्याने भारतातील एकूण करोना रुग्णांची संख्या 127 वर पोहोचली आहे. वाचा-#BREAKING कोरोना व्हायरसचा मुंबईत पहिला बळी, 64 वर्षीय व्यक्तिचा मृत्यू वाचा-मुलुंडमध्ये कोरोना औषधांची करत होता फ्री होम डिलीव्हरी, एफडीएनं टाकली धाड भारतात कोरोनाचा तिसरा बळी याआधी 29 फेब्रुवारी रोजी कोरोनाचा पहिला बळी भारतात झाला होता. कर्नाटकातील 76 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर काही दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. ते आपल्या कुटुंबियांसमवेत सौदी अरेबियाला फिरायला गेला होते. त्यांच्या पत्नी आणि मुलगाही कोरना पॉझिटिव्ह आढळून आले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, 13 मार्च रोजी 68 वर्षीय महिलेचा दिल्लीत मृत्यू झाला होता. आता मुंबईतील मृत्यूने हा आकडा तीन झाला. मृतांचा आकडा वाढल्यामुळे सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाला बळी पडलेले तीनही रुग्ण 60 वर्षांच्या वरील वयोगटातील असल्यामुळे हा आजाराचा धोका वयस्कर रुग्णांमध्ये जास्त असल्याचे दिसत आहे. वाचा-कोरोनाला रोखण्यासाठी का आहेत भारताकडे फक्त 30 दिवस? जाणून घ्या कारण राज्यात 1063 प्रवासी दाखल राज्यात आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण 1063 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात 794 जणांना भरती करण्यात आले आहे. भरती करण्यात आलेल्यांपैकी 717 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 39 जण पॉझिटिव्ह आले आहेत. वाचा-लवकरच कोरोनाला सारं जग हरवणार, 'या' देशात सुरू आहे लसीची चाचणी येते 30 दिवस भारतासाठी महत्वाचे येते 30 दिवस भारतासाठी दोन कारणांमुळे महत्त्वाचे आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून भारतात कोरोना संसर्ग होण्याच्या प्रमाणात तुलनेने वेगाने वाढ झाली आहे. एकाकडून दुसर्‍याकडे आणि दुसऱ्याकडून तिसर्‍या टप्प्यात पोहचण्यासाठी 25-30 दिवसांचे अंतर आहे. सध्या परदेशातून येणाऱ्यांवरून सध्या भारतात बंदी आहे.
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या