विरारमध्ये मोबाईल शॉपवर चोरट्यांकडून गोळीबार, मालकाचा जागीच मृत्यू

विरारमध्ये मोबाईल शॉपवर चोरट्यांकडून गोळीबार, मालकाचा जागीच मृत्यू

कुंभार पाडा इथल्या रिद्धीसिद्धी मोबाईल अँड स्टेशनरीच्या दुकानात रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास दुचाकीवरून दोन चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने तोंडाला रुमाल बांधून गुप्ता यांच्या दुकानात शिरले.

  • Share this:

विजय देसाई, प्रतिनिधी

विरार, 16 डिसेंबर : विरार पूर्व कुंभारपाडा इथे मोबाईल शॉपवर बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी मोबाईल शॉप मालक आणि त्याच्या मेव्ह्ण्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात मालक विशाल गुप्ता याचा मृत्यू झाला असून विजयकुमार गुप्ता यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरारमध्ये झालेल्या या गोळीबारामुळे शहरात खळबळ माजली आहे.

कुंभार पाडा इथल्या रिद्धीसिद्धी मोबाईल अँड स्टेशनरीच्या दुकानात रविवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास दुचाकीवरून दोन चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने तोंडाला रुमाल बांधून गुप्ता यांच्या दुकानात शिरले.  त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानाचे शटर आतल्या बाजूने खेचून दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान विजयकुमार आणि विशाल गुप्ता या दोघांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला.

या झटापटीत एका चोरट्याने त्याजवळ असलेल्या गावठी कट्टा काढला आणि  विशाल, विजयकुमार या दोघांवर तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी विशाल गुप्ता याच्या छातीत लागल्याने त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर एक गोळी विजय कुमार याच्या पायाला लागली. त्यांची प्रकृती गंभीर असून रुग्णालयात उपचार सुरू आहे.

या घटनेवेळी झालेला आरडा-ओरड ऐकताच स्थानिकांनी मोबाईलच्या दुकानावर धाव घेतली आणि चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान एक चोरटा दुचाकीवरून निसटूनगेल तर दुसऱ्या चोराला संतप्त नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या सगळ्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आता प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, हा हल्ला व्यावसायिक स्पर्धेतून झाला की दुकान लुटण्यासाठी झाला याचा तपास विरार पोलीस करीत आहेत. पळून गेलेल्या चोराला शोधण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासणार आहेत. तर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेशही पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2019 09:17 AM IST

ताज्या बातम्या