ठाणे-बोरीवली बसमध्ये मद्यपीकडून गोळीबार, महिला जखमी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2017 10:57 PM IST

ठाणे-बोरीवली बसमध्ये मद्यपीकडून गोळीबार, महिला जखमी

07 एप्रिल : ठाण्यात बेस्टच्या बसमध्ये एका मद्यपीने गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडलीये. या घटनेत एक महिला जखमी झाली असून तिला वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

ठाणे-बोरिवली बसमध्ये एक मद्यपीने गोंधळ घातला. बसमध्ये एक प्रवाशाशी किरकोळ कारणावरून भांडण झालं म्हणून त्याने आपल्याकडे असलेल्या गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. बसमध्ये प्रवास करत असलेल्या महिलेच्या खांद्याला गोळी लागल्याने ती जखमी झाली. जखमी महिलेला वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.  कासारवडवली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडचा गावठी कट्टा जप्त करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2017 10:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...