Home /News /mumbai /

मोठी बातमी, मुंबईत फटाके फोडण्यास बंदी, पालिकेनं काढला आदेश

मोठी बातमी, मुंबईत फटाके फोडण्यास बंदी, पालिकेनं काढला आदेश

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. जर कुणी उल्लंघन केल्यास साथरोग नियंत्रण कायदा 1897 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

    मुंबई,  09 नोव्हेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackery) यांनी राज्यात फटाके फोडण्यावर बंदी (firecrackers ban) घालता येणार नाही, असं स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने (mumbai municipal corporation) मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. जर कुणी उल्लंघन केल्यास साथरोग नियंत्रण कायदा 1897 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. मुंबई महापालिकेनं एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकानुसार, शहरात सार्वजनिक ठिकाणी मोठे फटाके फोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.  कुठल्याही हॉटेल, क्लब,  जिमखाना, संस्था, मैदान यांच्या आवारात फटाके फोडण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. फक्त घराच्या, इमारतीच्या आवारात 14 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सौम्य स्वरूपाचे फटाके फोडत येणार आहे. यांना कोरोनाची भीती नाही! दिवाळीआधी बाजारपेठेत खरेदीसाठी उडाली झुंबड, पाहा PHOTO सौम्य स्वरुपाचे फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सॅनिटायझर हे ज्वलनशील असल्यामुळे दिवे लावताना किंवा फटाके फोडत असताना हाताला सॅनिटायझर लावू नये, असं आवाहनही पालिकेनं केले आहे. तसंच, फटाके फोडत असताना सॅनिटाझरची बाटली सोबत बाळगू नये, असं आवाहनही करण्यात आले आहे. सॅनिटायझर ऐवजी हात धुण्यासाठी साबनाचा वापर करा, असा पर्यायही पालिकेनं सूचवला आहे. जर सार्वजनिक ठिकाणी कुणी फटाके फोडता आढळलं तर साथरोज नियंत्रण कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि नियमभंगाच्या दृष्टीने लागू असणारे कायदे व अनुषंगिक नियम अन्वये कडक कारवाई करण्याचे निर्देश पालिकेनं दिले आहे. 'तेव्हा मुख्यमंत्रिपद एका ब्राह्मणाला दान केले', खडसेंचा फडणवीसांना टोला मुंबईत फटाकेबंदीच्या निर्णयामुळे फटाके विक्रेत्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरवर्षी मरिन ड्राईव्ह परिसरात फटाकेबाजी करण्यात असते, यंदा मात्र, पालिकेच्या आदेशामुळे फटाकेबंदी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्रात फटाके बंदी नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा 'गेल्या सात महिन्यांपासून लढा देऊन परिस्थिती आटोक्यात आली आहे. त्यामुळे चार दिवसांच्या धुरात हे वाहून जाता कामा नये, प्रदूषण टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्याचे टाळा, शक्यतो फटाके फोडूच नये. फटाके फोडले नाही तर उत्तमच आहे. दिवाळीतील चार महिने हे अत्यंत महत्त्वाचे आहे. फटाकेवर बंदी आणली जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेऊन फटाके फोडू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या