बूचर आयलँडवर लागलेली आग 78 तासांनी विझली!

मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई अग्नीशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झालेलं नाही आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2017 01:55 PM IST

बूचर आयलँडवर लागलेली आग 78 तासांनी विझली!

मुंबई, 07 आॅक्टोबर : अखेर बूचर आयलँडवर तेलसाठ्यांना लागलेली आग ७८ तासांनी विझली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ४:३० वाजता मुंबई जवळच्या बूचर आयलँडवरील बीपीसीएलचा टँकफाॅर्म क्रमांक १३ वर मुसळधार पावसात वीज पडल्यामुळे भीषण आग लागली होती.

या भीषण आगीत तेलटाकीतील तब्बल ३२ हजार मेट्रिक टन हाय स्पीड डिझेल सतत जळत होतं. हाय स्पीड डिझेल हे अत्यंत ज्वालाग्राही असं इंधन आहे. त्यामुळे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलांच्या जवानांना मोठा संघर्ष करावा लागला. आग लागलेल्या ठिकाणी तब्बल ३५० डिग्री सेल्सिअस इतकं तापमान होतं. या तापमानात तेलटाकीचे स्टेनलेस स्टील देखील वितळून गेलंय. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना जवळ जाऊन पाणी आणि फोमचा मारा करणं कठीण जात होतं. पण तरीही मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई अग्नीशमन दलाच्या जवानांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झालेलं नाही आहे. मात्र या भीषण आगीने पर्यावरणाचे अनेक प्रश्नं निर्माण केलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2017 09:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...