'झिंग झिंग झिंगाट'च्या सेटवर आग, अभिनेते आदेश बांदेकर थोडक्यात बचावले

'झिंग झिंग झिंगाट'च्या सेटवर आग, अभिनेते आदेश बांदेकर थोडक्यात बचावले

आग लागली त्यावेळी आदेश बांदेकर आणि सर्व स्पर्धक मुख्य स्टेजवरच होते.

  • Share this:

मुंबई, 5 जानेवारी : 'झिंग झिंग झिंगाट' या एका मराठी वाहिनीवरील कार्यक्रमाच्या शुटींगदरम्यान सेटवर आग लागली. आग लागली त्यावेळी आदेश बांदेकर आणि सर्व स्पर्धक मुख्य स्टेजवरच होते. पण सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही.

चेंबूर ट्राँम्बे येथील एस्सार स्टुडियोला आग लागली. या स्टुडियोमध्ये 'झिंग झिंग झिंगाट' या कार्यक्रमाचा सेट आहे. आग लागल्याचं लक्षात येताच आदेश बांदेकर यांनी सर्व स्पर्धकांना सुखरुप स्टुडियो बाहेर काढलं. आदेश बांदेकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला.

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे.

दरम्यान, दुर्घटना आदेश बांदेकर यांची पाठ सोडायला तयार नाहीत, असंच दिसतंय. कारण याआधी कार अपघात आणि जेवणातून झालेली विषबाधा यामुळे आदेश बांदेकर थोडक्यात बचावले होते.

फेब्रुवारीमध्ये आदेश बांदेकर यांच्या कारला कराड रोडवर अपघात झाला होता. सुदैवाने ते या अपघातातून सुखरूप बचावले. कारचा टायर फुटल्यामुळं हा अपघात झाला होता.

कारचा टायर फुटल्यामुळे गाड्या एकमेकांवर आदळल्या आणि अपघात झाला. यावेळी ड्रायव्हरच्या बाजुच्या सिटवरच आदेश बांदेकर बसले होते. त्यांनी सिटबेल्ट लावले असल्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.


VIDEO : ...म्हणून अनुपम खेर यांनी The Accidental Prime Minister सिनेमा नाकारला होता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 5, 2019 03:59 PM IST

ताज्या बातम्या