मुंबईत पुन्हा अग्नितांडव, ऑर्बिट टेरेस इमारतीला आग

ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Dec 29, 2018 08:44 AM IST

मुंबईत पुन्हा अग्नितांडव, ऑर्बिट टेरेस इमारतीला आग

मुंबई, 29 डिसेंबर : लोअर परळ भागातील कमला मिल कंपाऊंडच्या समोर असणाऱ्या ऑर्बिट टेरेस या इमारतीला आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेलं आगीचं सत्र थांबताना दिसत नाही. पहाटेच्या सुमारास ऑर्बिट टेरेस या बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतीला आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचं कोणतंही वृत्त नाही. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ऑर्बिट टेरेस इमारतीला आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली, याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र सातत्याने घडणाऱ्या या दुर्घटना थांबणार कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबईतील आगीचं सत्र

चेंबूर इमारत आग दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू

Loading...

टिळकनगर येथील सरगम सोसायटीमधील 35  क्रमांकाच्या इमारतीमध्ये 14 व्या मजल्यावर नुकतीच आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या पोहोचल्या आणि 2 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून यात 4 वृद्धांचा समावेश होता.

भिवंडीतील कालवारगावच्या हद्दीतील गणराज कंपाऊंडमध्ये पुठ्ठ्याच्या गोदामाला शुक्रवारी भीषण आग लागली होती. या आगीत सुमारे 18 गोदाम जळून खाक झाले. विविध राज्यांतून भंगारमध्ये जमा केलेला कोट्यवधी रुपयांचा पुठ्ठा जळून खाक झाला. ही आग एवढी भीषण होती की, आगीमुळे गोदामाच्या भिंती पडल्या.


VIDEO : भीमा कोरेगाव : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद नजरकैदेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: firemumbai
First Published: Dec 29, 2018 08:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...