डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळील पुलाखाली लागलेली आग आटोक्यात

डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळील पुलाखाली लागलेली आग आटोक्यात

डोंबिवली पूर्वमधील रेल्वे स्टेशनजवळील पादचारी पुलाखाली भीषण आग लागलीये

  • Share this:

21 एप्रिल : डोंबिवली पूर्वमधील रेल्वे स्टेशनजवळील पादचारी पुलाखाली लागलेली आग काही तासांत आटोक्यात आलीये. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या पादचारी पुलाखाली फेरीवाल्यांची दुकानं आहे. या फेरीवाल्यांच्या दुकानाचा कचरा हा पुलाच्या भिंतीला लागूनच टाकलेला असतो. आज संध्याकाळी 9.30 च्या सुमारास अज्ञातांनी या कचऱ्याला आग लावली. काही वेळानंतर आगीने रोद्ररुप धारण केलं. आगीचे लोट पुलाच्या वरच्या भागापर्यंत पोहचले.  धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत होते. घटनास्थळी अग्निशमन दलाने धाव घेऊन आग आटोक्यात आणली.  मात्र ही आग कुणी आणि का लावली हे मात्र कळू शकलं नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2017 10:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading