Home /News /mumbai /

ठाण्यात वडापाव सेंटरमध्ये गॅस गळती; सिलिंडरने पेट घेतल्याने महिला गंभीर जखमी

ठाण्यात वडापाव सेंटरमध्ये गॅस गळती; सिलिंडरने पेट घेतल्याने महिला गंभीर जखमी

Representative Image

Representative Image

Gas Fire at Thane: ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअम परिसरातील खारटन रोड येथील एका वडापाव सेंटरमध्ये (Fire at vadapav center) आगीची घटना घडली आहे.

    ठाणे, 11 डिसेंबर: ठाण्यातील (Thane) दादोजी कोंडदेव स्टेडिअम परिसरातील खारटन रोड येथील एका वडापाव सेंटरमध्ये (Fire at vadapav center) आगीची घटना घडली आहे. गॅस पाइपलाईनमध्ये झालेल्या लिकेजमुळे (gas pipeline leakage) गॅस सिलिंडरचा भडका झाला होता. या आगीत वडापाव सेंटरमध्ये काम करणारी महिला गंभीररित्या जखमी (Woman injured in gas fire) झाली आहे. गॅस सिलिंडरच्या रेग्युलेटरला लागलेल्या आगीत त्या 20 टक्के भाजल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियमसमोरील नागसेन नगर परिसरात एक वडापाव सेंटर आहे. संबंधित वडापाव सेंटर कैलास साधनकर यांच्या मालकीचं असून उपेंद्र परचा यांनी हे वडापाव सेंटर चालवायला घेतलं आहे. उपेंद्र परचा आपल्या पत्नीच्या मदतीने हे वडापाव सेंटर चालवतात. घटनेच्या दिवशी शनिवारी दुपारी राजबिरी उपेंद्र परचा या नेमही प्रमाणे वडापाव सेंटरमध्ये काम करत होत्या. हेही वाचा-क्रीडाविश्व हादरलं! सराव संपताच सुरू झाला त्रास; क्रिकेटपटूचा हृदयद्रावक शेवट यावेळी गॅस पाईपलाईनमध्ये लिकेज झाल्याने वडापाव सेंटरमध्ये अचानक भडका उडाला आणि सिलिंडरच्या रेग्युलेटरला आग लागली. काही कळाच्या आत अवघ्या क्षणात या सर्व घडामोडी घडल्याने राजबिरी परचा यांचे दोन्ही हात आणि पाय 20 टक्के भाजले आहेत. ही घटना घडताच स्थानिकांनी राजबिरी यांना तातडीने आगीतून बाहेर काढत कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. हेही वाचा-वसतिगृहातील जेवणात आढळल्या अळ्या; वर्ध्यात विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ जखमी राजबिरी यांची प्रकृती सध्या सुधारत असून त्या 20 टक्के भाजल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. ठाणे महानगरपालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेत वडापाव सेंटरचं किरकोळ नुकसान झालं आहे. जखमी राजबिरी परचा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Fire, Thane

    पुढील बातम्या