Home /News /mumbai /

ठाण्यात पुन्हा अग्नितांडव; लाखोंच्या महागड्या गाड्या जळून खाक, पाहा VIDEO

ठाण्यात पुन्हा अग्नितांडव; लाखोंच्या महागड्या गाड्या जळून खाक, पाहा VIDEO

आज पहाटे साडेचारच्या सुमारास ठाण्यातील वसंत विहार परिसरात भीषण आग (Fire at thane) लागल्याची घटना घडली आहे.

    ठाणे, 13 सप्टेंबर: आज पहाटे साडेचारच्या सुमारास ठाण्यातील वसंत विहार परिसरात भीषण आग (Fire at thane) लागल्याची घटना घडली आहे. येथील सिद्धाचल कॉम्प्लेक्समधील फेज सिक्स इमारतीतील पार्किंग लॉटमध्ये ही आग लागली होती. दरम्यान पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या लाखो रुपये किंमतीच्या गाड्या जळून खाक (lakhs of rupees worth vehicles burnt) झाल्या आहेत. या आगीत दोन चारचाकी गाड्यांसह चार दुचाकी गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. या दुर्घटनेत वाहनांच्या मालकांचं लाखोचं नुकसान झालं आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. जळून खाक झालेल्या गाड्यांमध्ये एक होंडा सिटी कार, एक होंडा jazz कार, एक हार्ली डेव्हिडसन महागडी मोटरबाईक, एक रॉयल एनफिल्ड बुलेट, एक बजाज स्कूटर आणि एक वेस्पा स्कूटर यांचा समावेश आहे. पहाटे चारच्या सुमारास या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची टीम आणि ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाची टीमनं घटनास्थळी धाव घेतली होती. हेही वाचा-निर्दयी पतीकडून नवविवाहितेला बेल्टने अमानुष मारहाण;खुनाच्या घटनेनं नांदेड हादरलं दोन्ही टीमनं आग विझवत गाड्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण या भीषण आगीत काही गाड्या पूर्णतः जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे गाडी मालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. विशेष म्हणजे सिद्धाचल कॉम्प्लेक्समध्ये 24 तास सुरक्षारक्षक असतात. असं असताना गाड्यांना आग कशी लागली?  असा प्रश्न सर्वांना पडला आहे. सदरची आग लागणं हा अपघात आहे की कोणी मुद्दाम हे कारस्थान केलं आहे. याचा तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Fire, Thane

    पुढील बातम्या