साखरझोपेत असताना मुंबईत 2 ठिकाणी भीषण आग, आगीचं रौद्र रुप दाखवणारा VIDEO

साखरझोपेत असताना मुंबईत 2 ठिकाणी भीषण आग, आगीचं रौद्र रुप दाखवणारा VIDEO

मुंबईत मध्यरात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी भीषण आग लागली.

  • Share this:

मुंबई, 25 जून : एकीककडे कोरोना व्हायरसचं संकट आणि लॉकडाऊनमुळे झालेलं नुकसात यात आणखी भार पडली ती आणखी एका संकटाची. मुंबईत मध्यरात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी भीषण आग लागली. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अंधेरी पूर्वेकडील मरोळ परिसरात नंदधाम उद्योग इथल्या मेट्रो लॅबोरेटरी कारखान्यात आग लागली होती. तर दुसरी आग दक्षिण मुंबईतील नरीमन पॉइंट इथे लागल्यानं मोठं नुकसान झालं आहे.

मरोळमधील मेट्रो लॅबोरेटरी कारखान्याला लागलेल्या आगीत सामान जळून खाक झालं आहे. आग भडकली तेव्हा दोन कामगार या कारखान्यात असल्याची माहिती मिळाली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी दोन कामगारांचं रेस्क्यू ऑपरेशन केलं. 5 फायर इंजिन,1 फोम टँकर,7 जम्बो टँकरच्या मदतीनं सुमारे 4 तासांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं.

नरीमन पॉइंट येथील जमनालाल बजाज रोड जोली मेकर चेंबरमधील बँक ऑफ बहरीन आणि कुवैतच्या सर्व्हर रूमला आग लागली होती. ही आग पहाटेच्या सुमारास लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

या आगीत कॉम्प्युटरसह काही कागदपत्र, फाईल्स जळून खाक झाल्या तर वातानुकूलित यंत्र सुद्धा जळाल्यानं मोठं नुकसान झालं आहे. मुंबईत लागलेल्या या दोन्ही आगींमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती मिळाली आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 25, 2020, 8:03 AM IST

ताज्या बातम्या