मुंबई 26 ऑगस्ट: दक्षिण मुंबईतल्या फोर्टमधील ‘बाहुबली’ या इमारतीला आग लागली आहे.ही आग तळमजला आणि दुसऱ्या मजल्याला लागली आहे. या आगीत आतापर्यंत एक तरुण तीस टक्के भाजला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. ही दुसऱ्या क्रमांकाची आग असून पाच फायर इंजिन आणि पाच वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीचं कारण नेमकं कळू शकलेलं नाही.
आग पसरू नये म्हणून फायर ब्रिगेडचे जवान काळजी घेत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत सातत्याने आगीच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाची कॉर्पोरेट कार्यालये या भागात आहेत.
आग लागलेली इमारत ही व्यावसायीक इमारत होती. रात्री दुकाने बंद असल्याने मोठी हानी टाळली गेली. रात्री उशीरा आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलं. नंतर फायर ब्रगिडने कुलिंगचं काम केलं. काही तासांच्या प्रयत्नांनंतरही आग आटोक्यात आली. शॉर्ट सक्रिटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.