भिवंडीतील आगीवर 4 तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात यश

भिवंडीतील आगीवर 4 तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात यश

शनिवारी पहाटेच्या सुमारास भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली.

  • Share this:

भिवंडी, 25 जानेवारी: भिवंडी परिसरात वारंवार आग लागल्याच्या घटना समोर येत आहेत. शनिवारी पहाटेच्या सुमारास भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या गोदामात  पुठ्ठा, कोम, लोचन,  कापडाच्या ध्या,  प्लास्टिक, यंत्रमाग मशीन असे भंगार होते. कापडामुळे आगीचा भडका उडाला आणि पसरली. संपूर्ण गोदाम आगीच्या भक्षस्थानी आलं. आग लागल्याची माहिती मिळताच भिवंडी,  कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या  5 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या कुलींग ऑपरेशन सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण समजू शकलं नाही. मात्र भंगार गोदामापासून काही अंतरावर घर असल्यानं आगीवर वेळीच नियंत्रण मिळवलं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता.

या गोदामात पुठ्ठा, कोम, लोचन, कापडाच्या चिंध्या, प्लास्टिक, यंत्रमाग मशीन असे भंगार आगीत जळून खाक झाले आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. तर जवळपास काही अंतरावर रहिवासी घरं असल्यानं ही आग धुमसत राहू नये म्हणून अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून यात कोणीही जखमी झाल्याची माहिती समोर आली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2020 07:31 AM IST

ताज्या बातम्या