News18 Lokmat

मुंबई : चेंबूर भागात गोडाऊनला भीषण आग

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2017 05:32 PM IST

मुंबई : चेंबूर भागात गोडाऊनला भीषण आग

04 एप्रिल : मुंबईच्या चेंबूर भागात एका गोडाऊनला भीषण आग लागलीय. पुर्व द्रुतगती मार्गाजवळ ही आग लागलीय.

चेंबूर भागातील नेहरुनगरमध्ये  टायर बनवणाऱ्या कंपनीच्या एका गोडाऊनला भीषण आग लागली. हे गोडाऊन रहिवासी भागात आहेत. अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत आहे. खबरदारी म्हणून पुर्व द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक थांबवून ठेवण्यात आलीये. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीये. आग विझवण्याच काम युद्धपातळीवर सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 4, 2017 04:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...