Home /News /mumbai /

ठाण्यात भीषण अग्नितांडव, एकामागेएक 9 सिलेंडरचा स्फोट? नागरिकांमध्ये धाकधूक

ठाण्यात भीषण अग्नितांडव, एकामागेएक 9 सिलेंडरचा स्फोट? नागरिकांमध्ये धाकधूक

ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात अंबिका नगरमध्ये एका कंपनीत मोठी आग लागली आहे.

ठाणे, 28 मे : ठाण्यातून (Thane) एक वाईट बातमी समोर आली आहे. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात अंबिका नगरमध्ये आगीची मोठी घटना समोर आली आहे. ही आग आज रात्री दहा वाजेच्या सुमारास लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वागळे इस्टेट परिसरात रोड नंबर 29 मध्ये प्लॉट नंबर ए-202 मध्ये ही आग लागली. आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. आगीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. पण आग खूप मोठी असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. कारण स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळ परिसरातून तब्बल 7 ते 8 वेळा मोठ्या स्फोटाचा आवाज आला आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळेच ही आग वाढत असल्याची भीती स्थानिकांकडून वर्तवली जात आहे. "घटनास्थळी महावितरण कर्मचारी, वागळे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे कर्मचारी 2- फायर वाहन, 1- रेस्क्यू वाहन, 2 वॉटर टँकरसह उपस्थित असून, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांन कडून सदर आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत", अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ('महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी भाजपने संभाजी छत्रपतींचा गैरवापर केला', संजय राऊतांचा प्रहार) संबधित आगीची घटना ज्या भागात घडली आहे तो रहिवासी परिसर नसून कमर्शिअल एरिआ आहे. पण या परिसराला लागून काही झोपडपट्ट्या आहेत. सुदैवाने झोपडपट्ट्यांपर्यंत ही आग पोहोचलेली नाही. एका केमिकल कंपनीत ही आग लागली आहे. तिथे प्रयोगशाळा देखील आहे. त्याच प्रयोगशाळेत सिलेंडर होते. या प्रयोगशाळेत आग लागली. त्यातून सात ते आठ सिलेंडरचे स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. कारण आग लागलेल्या परिसरातून वारंवार स्फोटाचे आवाज येत आहेत. कंपनी आणि प्रयोगशाळेत लागलेली आग ही झोपडपट्टीपर्यंत पोहोचण्याची भीती वर्तवली जात आहे. पण ही आग आणखी वाढू नये यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या