मुंबईत भीषण आग, 2 वर्षांच्या चिमुकल्यासह 7 जण जखमी

मुंबईत भीषण आग, 2 वर्षांच्या चिमुकल्यासह 7 जण जखमी

2 तासांनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश.

  • Share this:

मुंबई, 06 जानेवारी: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईमध्ये आगीनं रौद्र रुप धारण केलं. कामाठीपुरा बगदादी इस्टेटमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सकाळी 9.16 वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं. भेंडी बाजार परिसर गजबजाट आणि दाटीवाटीचा आहे. दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं आहे. या दुर्घटनेत 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. जखमींमध्ये 2 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.

कामाठीपुरा बगदादी इस्टेटमध्ये ज्या इमारतीच्या मजल्यावर आग लागली तिथे चपलांचा कारखाना असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चपालांसाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान चपलांसाठी वापरण्यात आलेल्या केमिकलमुळे आग लागली आगीनं रौद्र रुप धारण केलं आणि त्यात शॉर्ट सर्किट झाल्यानं आग भडकली. त्यामुळे नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत होते. मात्र दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. तर 8 जखमी असलेल्यांवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

First published: January 6, 2020, 10:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading