मुंबईतील कमर्शियल इमारतीत 5 तास अग्नितांडव! 12 लोकांना रेस्क्यू करण्यात यश, 2 जवान जखमी

मुंबईतील कमर्शियल इमारतीत 5 तास अग्नितांडव! 12 लोकांना रेस्क्यू करण्यात यश, 2 जवान जखमी

या आगीचा भडका खूप मोठा होता. जवळपास दोन मजले या आगीच्या भक्ष्यस्थानी होते.

  • Share this:

मुंबई, 05 ऑक्टोबर : अनलॉक 5 च्या दुसऱ्याच आठवडात मोठ्या प्रमाणात बाजारपेठा उघडल्या असताना मस्जिद बंदर परिसरात भीषण आग लागली होती. रविवारी संध्याकाळच्या सुमारास अब्दुल रहमान रस्त्यावर असलेल्या कटलरी मार्केटमध्ये ही आग लागल्याची माहिती मिळाली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले मात्र आग मोठ्या प्रमाणात वाढत होती.

जवळपास संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत ही आग धुमसत होती. साधारण 6 च्या सुमारास इस्माइल नावाच्या इमारतीमध्ये ही आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवलं होतं मात्र त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा एकदा तिथेच आग लागली. या आगीचा भडका खूप मोठा होता. जवळपास दोन मजले या आगीच्या भक्ष्यस्थानी होते.

या इमारतीमध्ये कर्मशियल मार्केट, मोबाईल आणि पर्फ्यूम्सची मोठी दुकानं आहेत. संध्याकाळी आग लागली त्यावेळी तिथल्या दुकानांमध्ये 8 ते 10 लोक होते. अग्निशमन दलानं या लोकांना बाहेर काढलं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या कामाला लागले. आग नियंत्रणात आल्यानंतरही पुन्हा रात्री उशिरा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 5, 2020, 7:20 AM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या