हॉटेल्स आणि पबप्रमाणे रस्त्यांवरच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचंही फायर ऑडिट करा - मुंबई हायकोर्ट

हॉटेल्स आणि पबप्रमाणे रस्त्यांवरच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचंही फायर ऑडिट करा - मुंबई हायकोर्ट

मुंबईतल्या हॉटेल्स आणि पबप्रमाणे रस्त्यांवरच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचंही फायर ऑडिट करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.

  • Share this:

मुंबई, 16 जानेवारी : मुंबईतल्या हॉटेल्स आणि पबप्रमाणे रस्त्यांवरच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचंही फायर ऑडिट करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. कमला मिल दुर्घटना ही प्रशासनाचे डोळे उघडणारी ठरलीय असं मुंबई हायकोर्टानं म्हटलं आहे. या रेस्टॉरंटकडे काही परवानग्या नसताना आपला व्यवसाय करत होत्या, हे कसं घडतंय, असा सवालही हायकोर्टानं विचारला आहे. या सगळ्यावर कडक पवित्रा घेत मुंबई हायकोर्टानं सगळ्यांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

ज्यांना नुकतेच परवाने दिले आहेत, फायर प्रमाणपत्र दिलं आहेत त्यांचीही पुन्हा तपासणी करा असंही या आदेशामध्ये नमुद करण्यात आलं आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या ठिकाणी अग्निरोधक नियमावलीचं योग्य रितीने पालन होतंय की नाही, यावर स्थानिक प्रशासन या नात्यानं पालिकेची देखरेख हवी. तसंच परवाने जारी केल्यानंतरही त्याठिकाणी सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन होतय की नाही, याची पडताळणी प्रशासनाकडनं व्हायला हवी असंही हायकोर्टानं म्हटलं आहे. फूटपाथवरच्या फूड स्टॉल्स हे महानगरपालिकांच्या निकषात आहेत की नाहीत हे मुंबई मनपानं तपासावं आणि त्याची माहिती सादर करावी. या सगळ्यावर पालिका गुरुवारी किंवा शुक्रवारी अहवाल सादर करेल अशी माहिती बीएमसीनं हायकोर्टात दिली आहे.

कमला मिल आगी प्रकरणात मुंबई मनपा आणि राज्य सरकारीची भूमिका

मुंबई मनपा : अग्निशमन दलात अधिकारी आणि कर्मचारी यांची कमतरता आहे. या जागा भरण्यात याव्यात यासाठी आम्ही पावलं उचलली आहेत.

राज्य सरकार : एसआयटीची मागणी याचिकेत करण्यात आली आहे पण तशी गरज नाही आहे. पोलिसांनी अगोदरच या प्रकरणात तपास सुरु केलेला आहे.

खरं तर कमला मिल घटनेनं अग्नी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. मुंबई मनपानं प्रत्येक वॉर्डात फायर सेफ्टी ऑफिसर्सची नियुक्ती करावी असं मुंबई हायकोर्टचं म्हणणं आहे.

First published: January 16, 2018, 10:34 AM IST

ताज्या बातम्या