BREAKING: आणखी एका रुग्णालयात अग्नितांडव, विरारमध्ये 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू

BREAKING: आणखी एका रुग्णालयात अग्नितांडव, विरारमध्ये 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू

Virar Hospital Fire: मुंबईपासून काहीच अंतरावर असणाऱ्या विरारमधून आगीची भयंकर घटना समोर येते आहे. या आगीमध्ये 13 रुग्णांनी प्राण गमावले आहे.

  • Share this:

विरार, 23 एप्रिल: मुंबईतील भांडूपमध्ये असणाऱ्या कोव्हिड सेंटरमध्ये आग, नागपूरमध्ये कोव्हिड सेंटरल आग, भंडारा याठिकाणी रुग्णालयामध्ये लागलेली आग इ. या घटना ताज्याच असताना  मुंबईपासून काहीच अंतरावर असणाऱ्या विरारमधून आगीची भयंकर घटना समोर येते आहे. या आगीमध्ये 13 रुग्णांनी प्राण गमावले आहे. विरार पश्चिम याठिकाणी विजय वल्लभ या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना घटना घडली आहे.

सुरुवातीला याठिकाणी एकूण 17 रुग्ण अडकल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान लेटेस्ट अपडेट नुसार याठिकाणी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून पोलिसांकडून याठिकाणी मदतकार्य करण्यात आले. शिवाय रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्यासाठीही युद्धपातळीवर हालचाली करण्यात आल्या. कोव्हिड रुग्णालयात ही आग लागल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी 90 कोव्हिड रुग्ण उपचार घेत होते.

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या अतिदक्षता विभागात अचानक रात्री 3 च्या सुमारास लागली. आग इतकी भीषण होती की, यात अतिदक्षता विभागातील 13 रुग्ण यामध्ये दगावले आहेत. अग्निशमन विभागाने आग विझवली आहे.

या दुर्घटनेमध्ये संपूर्ण आयसीयू बेचिराख झालं आहे. याठिकाणी आयसीयूमध्ये डॉक्टरच नव्हते असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. दोषींवर कारवाई केली जावी अशी मागणी याठिकाणी केली जात आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: April 23, 2021, 7:08 AM IST

ताज्या बातम्या