• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! आज पुन्हा एकाच दिवसात आगीच्या दोन घटना

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! आज पुन्हा एकाच दिवसात आगीच्या दोन घटना

मुंबईच्या भांडुप परिसरातील (Bhandup Sunrise Hospital Fire) आगीची घटना ताजी असताना प्रभादेवी परिसरातून आणखी एका आगीची (Fire at Prabhadevi) माहिती मिळते आहे.

  • Share this:
मुंबई, 27 मार्च: मुंबईच्या भांडुप परिसरातील (Bhandup Sunrise Hospital Fire) आगीची घटना ताजी असताना प्रभादेवी परिसरातून आणखी एका आगीची (Fire at Prabhadevi) माहिती मिळते आहे. प्रभादेवी याठिकामी असणाऱ्या गॅमा हाऊस इमारतीला ही आग लागली आहे. गॅमा हाऊस इमारतीच्या बेसमेंट आणि तळमजल्याला ही आग लागली आहे. प्रभादेवीतून जाणाऱ्या वीर सावरकर मार्गावर ही चार मजली इमारत आहे. आग लागल्यानंतर एकच खळबळ याठिकाणी उडाली होती. दरम्यान लेव्हल 2 च्या या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी 4 फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि पाण्याचे 8 जंबो टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. व्यावसायिक वापरासाठी या इमारतीचा वापर होत होता. दरम्यान इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक केबल आणि इतर ज्वलनशील गोष्टी असल्याने आगीचा धोका वाढू शकतो. याठिकाणी आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झालेले नाही. (हे वाचा-कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू कितपत फायद्याचं, आरोग्यमंत्री म्हणाले..) तर दुसरी आगीची घटना कुर्ल्यातून समोर येते आहे. कुर्ल्यात (Kurla Fire) सर्वोदय मार्गावरील एका झोपडपट्टीला (Fire at Slum Area) देखील आग लागली आहे. भाभा  रुग्णालयाच्या बाजूलाच ही झोपडपट्टी आहे. त्यामुळे धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. याठिकाणी देखील अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Published by:Janhavi Bhatkar
First published: