मुंबईतील दादरमध्ये एलआयसीच्या इमारतीला आग

मुंबईतील दादरमध्ये एलआयसीच्या इमारतीला आग

आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप कळू शकलं नाही.

  • Share this:

मुंबई, 31 डिसेंबर : मुंबईत सरत्या वर्षाच्या अखेरच्या दिवशीही आगीची घटना घडली आहे. दादर पश्चिमेला असलेल्या एलआयसीच्या इमारतीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप कळू शकलं नाही.

मागील आठवड्यात 3 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या. चेंबूर येथील टिळकनगरमध्ये सरगम सोसायटीमधील 35 क्रमांकाच्या इमारतीमध्ये 14 व्या मजल्यावर आग लागली होती. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला असून यात 4 वृद्धांचा समावेश आहे.

तर मागील आठवड्यात शनिवारी 29 डिसेंबरला वरळीतील साधना मिल कंपाउंडमध्ये एका इमारतीत आग लागली होती. यात 2 अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले होते. त्याच दिवशी लोअर परळ भागातील कमला मिल कंपाऊंडच्या समोर असणाऱ्या ऑर्बिट टेरेस या इमारतीला आग लागली होती.

(सांकेतिक फोटो)

=====================

First published: December 31, 2018, 10:55 PM IST

ताज्या बातम्या