Home /News /mumbai /

मुंबईत COVID हॉस्पिटलच्या ICUला आग, जीव धोक्यात घालून वाचवले 39 रुग्णांचे प्राण

मुंबईत COVID हॉस्पिटलच्या ICUला आग, जीव धोक्यात घालून वाचवले 39 रुग्णांचे प्राण

रुग्णालय कर्मचारी आणि फायर ब्रिगेडच्या (Fire Brigade) जवानांनी जीव धोक्यात घालून सर्व रुग्णांना सुरक्षीत बाहेर काढलं. त्यांच्यावर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

    मुंबई 12 ऑक्टोबर: मुंबईत डॉक्टरांची कोरोनाशी लढाई सुरू असतानाच संकटं पाठलाग सोडायला तयार नाहीत. मुलुंडमधल्या अपॅक्स Covid-19 हॉस्पिटलमध्ये सोमवारी आग लागली. या हॉस्पिटलच्या ICUमध्येच ही आग लागल्याने प्रचंड गोंधळ उडाला. मात्र सुदैवाने सर्व रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळालं. या वॉर्डमध्ये 39 कोरोना रुग्ण भरती होते. रुग्णालय कर्मचारी आणि फायर ब्रिगेडच्या (Fire Brigade) जवानांनी जीव धोक्यात घालून सर्व रुग्णांना सुरक्षीत बाहेर काढलं. त्यांच्यावर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शॉट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती फायर ब्रिगेडने दिली आहे. हॉस्पिटलमध्ये धूर निघत असल्याचं दिसताच रुग्णांना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. त्यात थोडा जरी उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घटला असता. रुग्णवाहिका आणि बसेस मधून या रुग्णांना तातडीने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहितीही देण्यात आली. जनरेटरमध्ये शॉर्ट सक्रिट झालं आणि आग लागली असावी असा अंदाज फायर ब्रिगडच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट गेली 6 महिने कोरोनाशी निकराची झुंज देणाऱ्या राज्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सोमवारी पहिल्यांदाच रुग्णांच्या मृत्यूसंख्येत घट झाली असून आज 165 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून ही संख्या 300 ते 400 च्या दरम्यान होती. राज्यात 3 महिन्यात पहिल्यांदाच COVID रुग्णांच्या मृत्यूचा आकडा सर्वात कमी सोमवारी 15,656 रुग्ण बरे होऊन घरी परतले त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 12, 81, 896 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83.49 टक्के एवढे आहे.  तर मृत्यूदर 2.64 एवढा आहे. दिवसभरात राज्यात 70089 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात सध्या 2 लाख 12 हजार 439 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. Alert: राज्यातल्या या भागात पुन्हा मुसळधार पावसाचा IMDचा इशारा पुण्यातून दिलासा देणारी माहिती पुढे आली आहे. शहरात सोमवारी गेल्या 4 महिन्यातली निच्चांकी रुग्णवाढ नोंदवली गेली आहे. दिवसभरात पुण्यात 351 नवे रूग्ण आढळून आलेत तर 950 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला. सलग 15 दिवसांपासून पुण्यात रुग्णवाढीचा आलेख घसरणीला लागला असून ही सकारात्मक गोष्ट असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या