ठाण्यातील आर्केडिया मॉलमध्ये भीषण अग्नितांडव, आगीमुळे परिसरात धुराचे लोट

ठाण्यातील आर्केडिया मॉलमध्ये भीषण अग्नितांडव, आगीमुळे परिसरात धुराचे लोट

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घडनास्थळी दाखल झालं आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • Share this:

ठाणे, 02 ऑक्टोबर : अनलॉक 0.5 चा टप्पा सुरू झाल्यानंतर आणखीन काही दुकानं आणि सेवा सुरू झाल्या आहेत. याच अनलॉक 5 च्या पहिल्याच टप्प्यात ठाण्यात मोठी दुर्घटना घडली. ठाण्यातील ऑर्केडिया मॉलमध्ये भीषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घडनास्थळी दाखल झालं आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मॉल सुरू होण्याआधीच यामध्ये आग लागल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  हिरानंदानी इस्टेट इथल्या मॉलमध्ये भीषण अग्नितांडव पाहायला मिळाला. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले.

ही आग नेमकी कशामुळे लागली यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकली नाही. तसंच आत कोणी अडकलं आहे का? सकाळची वेळ असल्यामुळे गर्दी नव्हती परंतु सकाळी लवकर दुकानं उघडण्यासाठी कोणी लवकर आलं असेल आणि अडकलं का याचा सद्या शोध सुरू आहे. त्यासंदर्भात अग्निशमन दलाकडून अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही

Published by: sachin Salve
First published: October 2, 2020, 9:51 AM IST
Tags: thane

ताज्या बातम्या