मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह पोस्ट, तरुणाला मारहाण प्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा

मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह पोस्ट, तरुणाला मारहाण प्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्याला शिवसैनिकांनी आपल्या स्टाईलने धडा शिकवला होता

  • Share this:

मुंबई, 25 डिसेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्याला शिवसैनिकांनी आपल्या स्टाईलने धडा शिकवला होता. मात्र, या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जणांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर हिरामणी तिवारी नावाच्या या वक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी  केली होती. त्यानंतर संतापलेल्या  शिवसैनिकांनी तिवारी यांना भर चौकात त्याचे टक्कल करून बेदम मारहाण केली होती.

मारहाणीमुळे या व्यक्तीच्या कानाच्या पडद्याला दुखापत झाली. शिवसैनिकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी तिवारी याने केली होती. दरम्यान, हिरामणी तिवारी हे बजरंग दल या संस्थेशी संबंधित आहे. तसेच ते विश्व हिंदू परिषदेसाठी काम करत असल्याची माहितीही समोर आली. अखेर या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून मुंबईच्या वडाळ्यातील हिरामणी तिवारी यांना शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली. मात्र, तेवढ्यावर शिवसैनिक थांबले नाहीत तर त्यांनी हिरामणीचे चक्क मुंडन केले आहे. दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीची तुलना उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागच्या नरसंहाराशी केली होती. त्यावर हिरामणी तिवारी यांनी उद्धव ठाकरेंविरोधात फेसबूक पोस्ट टाकली होती. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी हिरामणी यांनी ही शिक्षा दिली.

एकीकडे उद्धव ठाकरेंच्या हाती राज्याची सूत्रे असताना शिवसैनिकांनी कायदा हाती घेतला आहे. विशेष म्हणजे, गृहखाते हे शिवसेनेकडेच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shivsena
First Published: Dec 25, 2019 11:51 PM IST

ताज्या बातम्या