Mirzapur सीरिजवर गुन्हा दाखल; चौकशीदरम्यान मुंबई आणि मिर्झापूर पोलिसांमध्ये बाचाबाची

Mirzapur सीरिजवर गुन्हा दाखल; चौकशीदरम्यान मुंबई आणि मिर्झापूर पोलिसांमध्ये बाचाबाची

गुरुवारी सकाळी मिर्झापूर पोलीस खार येथे फरहान अख्तरच्या चौकशीसाठी पोहचले. त्याच्या घरी मुंबई पोलीस आणि मिर्झापूर पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. मुंबई पोलिसांनी त्यांना नियमांचं पालन करत, योग्य ती परवानगी घेऊन या आणि मग चौकशी करा असं सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 22 जानेवारी : 'मिर्झापूर' वेबसीरीजवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी मिर्झापूर पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत दाखल झालेल्या मिर्झापूर पोलिसांचा, मुंबई पोलिसांशी काहीसा वाद झाला. मिर्झापूर पोलिसांची टीम फरहान अख्तरच्या घरी चौकशीसाठी पोहचली बाचाबाची झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून प्रथम परवानगी घ्या, असं म्हणत मिर्झापूर पोलिसांना तपासासाठी रोखण्यात आलं.

नियमांनुसार, कोणत्याही दुसऱ्या राज्यांतून आलेल्या पोलिसांना मुंबईत कोणत्याही केसचा तपास करण्यासाठी किंवा चौकशीसाठी मुंबई पोलीस नोडल ऑफिसरची परवानगी घ्यावी लागते. मिर्झापूर पोलीस गेल्या दोन दिवसांपासून क्राईम ब्रांच डीसीपी अकबर पठान यांच्या ऑफिसात जात आहेत, परंतु ते उपलब्ध नसल्याने मिर्झापूर पोलिसांना चौकशीसाठी परवानगी मिळली नाही.

(वाचा - Cambridge Analytica विरोधात CBI कडून गुन्हा दाखल, फेसबुक डेटा चोरी केल्याचा आरोप)

गुरुवारी सकाळी मिर्झापूर पोलीस खार येथे फरहान अख्तरच्या चौकशीसाठी पोहचले. मुंबई पोलिसांना याबाबत माहिती मिळताच, खार भागातील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये ही माहिती देण्यात आली. खार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी फरहान अख्तरच्या घरी पोहचले आणि त्याच्या घरी मुंबई पोलीस आणि मिर्झापूर पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. मुंबई पोलिसांनी त्यांना नियमांचं पालन करत, योग्य ती परवानगी घेऊन या आणि मग चौकशी करा असं सांगितलं. याचदरम्यान मिर्झापूर पोलीस फरहान अख्तरच्या घरून बाहेर पडले.

मिर्झापूर वेब सीरीजप्रकरणी झालेला वाद आणि यूपीमध्ये या सीरीजप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, मिर्झापूर-यूपी पोलीस मुंबईत दाखल झाले आहेत. मिर्जापुरमध्ये अरविंद चतुर्वेदी नावाच्या तक्रारदाराने 17 जानेवारी रोजी FIR दाखल केली आहे. एका विशेष जातीच्या भावना दुखावल्या, भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(वाचा - कबड्डी स्पर्धेदरम्यान दुर्घटना; मॅच सुरू असतानाच खेळाडूचा मृत्यू)

गुरुवारी सकाळी News 18 शी बोलताना मिर्झापूर पोलीस टीमचे बी.ए. चौरसिया यांनी सांगितलं की, मिर्झापूर वेब सीरीजबाबत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल आहे. मुंबई पोलिसांची परवानगी घेण्यासाठी, नोडल अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्यानंतर चौकशी सुरू केली जाईल. तसंच वेब सीरीजचे रितेश सिधवानी, फरहान अख्तर, भौमिक आणि अमेझॉन प्राईमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: January 22, 2021, 12:41 PM IST

ताज्या बातम्या