अखेर मोदी सरकार नरमले, पाच दिवसातच कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला मागे?

अखेर मोदी सरकार नरमले, पाच दिवसातच कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला मागे?

कांदा बंदीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांपासून ते राज्य सरकारने केंद्राच्या या निर्णयावर सडकून टीका केली होती.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : मोदी सरकारने सोमवारी अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता. परंतु, या निर्णयामुळे कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. तसंच विरोधकांनीही मोदी सरकारला धारेवर धरले होते. अखेर कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सोमवारपासून  बंदरात आणि सीमेवर कांदा अडवून ठेवण्यात आला होता.  पण, आता अडवून ठेवलेल्या कांदा निर्यातीला केंद्र शासनाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे हजारो मेट्रीक टन कांदा निर्यातीचा मार्ग झाला मोकळा झाला आहे. मात्र, देशातून विदेशात नियमीतपणे निर्यात केल्या जाणाऱ्या कांदा निर्यातीवर निर्णय घेण्याबाबत लवकरच माहिती दिली जाणार आहे.

शिवी दिल्याचा राग डोक्यात गेला, तलवारी-रॉडने मारहाण करून डोंबिवलीत तरुणाची हत्या

कांदा बंदीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांपासून ते राज्य सरकारने केंद्राच्या या निर्णयावर सडकून टीका केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस, भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पियूष गोयल यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त करत कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली होती.

शरद पवार यांनी पियुष गोयल यांची भेट घेऊन कांदा निर्यात बंदीचा निर्णय हा शेतकऱ्यांसह देशासाठी धोक्याचे असल्याचे पटवून दिली होते.

'निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे व आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण केंद्र सरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो', असं शरद पवारांनी गोयल यांना सांगितले होते.

'या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारत हा निर्यातीच्या बाबतीत एक बेभरवशाचा देश आहे अशी प्रतिमा बनण्याची शक्यता बळावते. ती आपल्याला परवडणारी नाही. या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना मिळतो' असंही पवारांनी गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

तर उदयनराजे भोसले यांनी, केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे.' अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली होती.

तसंच, 'बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे. तरी केंद्र सरकारने या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घेवून शेतकऱ्याना दिलासा द्यावा, अशी मागणीही उदयनराजेंनी केली होती.

निदान शरद पवारांशी तरी बोलायचे असते? शिवसेनेनं मोदींना करून दिली 'गुरूं'ची आठवण

तर देवेंद्र फडणवीस यांनीही पियूष गोयल यांना पत्र आणि फोनवर चर्चा करून कांदा निर्यात बंदीचा निर्णय हा शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहे, तो निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी विनंती केली होती.

तर दुसरीकडे राज्यभरात विविध शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात जोरदार आंदोलन केले होते. अखेर राजकीय आणि शेतकऱ्यांच्या दबावापुढे केंद्र सरकारला नमते घ्यावे लागले आहे.

Published by: sachin Salve
First published: September 19, 2020, 11:41 AM IST

ताज्या बातम्या