मुंबई 3 जून: देशातल्या अनेक बँकांना हजारो कोटींचा गंडा घालणारा उद्योगपती विजय मल्ल्या याला भारतात आणण्यात येणार आहे. ब्रिटनमधल्या कोर्टात मल्ल्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्याने त्याचं भारतात प्रत्यार्पण करण्याला कोर्टाने मान्यता दिली आहे. ब्रिटनमध्ये CBIची टीम हजर असून ते मल्ल्याला घेऊन मुंबईत होण्याची शक्यता सूत्रांनी दिलीय. मल्ल्याला भारताच्या स्वाधीन केल्यानंतर अधिकारी लगेच मुंबईकडे निघण्याची शक्यता आहे.
पुढच्या 24 तासांमध्ये तो मुंबईत येण्याची शक्यता आहे. विमानतळावर आल्यानंतर त्याची मेडिकल टेस्ट होणार आहे. त्यानंतर त्याला कोर्टात दाखल केलं जाणार आहे. मुंबईतल्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ऑर्थर रोड जेलमध्ये त्याला एका विशेष कोठडीत ठेवलं जाणार आहे. EDसुद्धा त्याची कस्टडी मागणार असून आर्थिक गैरव्यव्हराची चौकशी केली जाणार आहे.
मल्ल्याने विविध बँकांचं 9000 कोटींपेक्षा जास्त कर्ज बुडवलं आहे. कर्ज न फेडताच तो भारतातून पळून गेला होता. गेली अनेक वर्ष त्याने कोर्टाच्या माध्यमातून भारतात येण्यास टाळाटाळ चालविली होती. मात्र त्याचे सर्व प्रयत्न फसले आणि अखेर ब्रिटनच्या कोर्टाने त्याला भारताच्या स्वाधीन केलं आहे.
हे वाचा - VIDEO: जन्मत:च हात नसल्याने पायांनी चालवते गाडी,आनंद महिंद्रांकडून तरूणीचं कौतुकप्रवाशांनो लक्ष द्या! 31 मेपर्यंत रद्द केलेल्या तिकिटांचा निधी रेल्वेने केला परत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.