अखेर संजय राठोड पोहोचले मंत्रिमंडळाच्या बैठकीला!

अखेर संजय राठोड पोहोचले मंत्रिमंडळाच्या बैठकीला!

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळातील महत्त्वाची मंत्री हजर आहे.

  • Share this:

मुंबई, 24 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavhan) प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे वादात सापडले आहे. पोहोरादेवी इथं शक्तिप्रदर्शन केल्यानंतर संजय राठोड हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर झाले आहे.

गेल्या 15 दिवसांपासून गायब झालेले संजय राठोड मंगळवारी पोहोरादेवी मंदिरात दर्शनाला पोहोचले होते. आपण कुठेही गेलो नव्हतो, शासकीय बंगल्यावरूनच काम पाहत होतो, असं सांगत त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरूवात केली. आज सकाळी यवतमाळमध्ये कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यासाठी काय उपाययोजना, खबरदारी घेता येईल याबद्दल त्यांनी सूचना दिल्या.

बैठक आटोपल्यानंतर संजय राठोड मुंबईला रवाना झाले. आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला संजय राठोड हजर झाले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळातील महत्त्वाची मंत्री हजर आहे.

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला संजय राठोड हे गैरहजर होते. पूजा चव्हाण प्रकरणावर आपली बाजू मांडल्यानंतर संजय राठोड हे कामाला लागले आहे.

शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी

दरम्यान,  मंगळवारी दुपारी संजय राठोड यांनी पोहरादेवी दर्शनाच्या निमित्ताने केलेलं शक्तिप्रदर्शन महाविकास आघाडीच्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आवडले नाही. संजय राठोड प्रकरणी शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण एकूणच ज्या पद्धतीने हाताळलं गेलं त्याबाबत शरद पवार समाधानी नाहीत. ते ठाकरे सरकारवर नाराज असल्याचं समजतं. तसंच या प्रकरणी तपास पूर्ण होईपर्यंत संजय राठोड यांनी पदापासून दूर राहावं, असंही शरद पवारांचं मत असल्याचं समजतं.

Published by: sachin Salve
First published: February 24, 2021, 4:00 PM IST

ताज्या बातम्या