मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अखेर कंगना आणि तिची बहिणी पोलीस स्टेशनला पोहोचली, VIDEO

अखेर कंगना आणि तिची बहिणी पोलीस स्टेशनला पोहोचली, VIDEO

 मुंबई उच्च न्यायालयाने आज कंगना आणि तिच्या बहिणीला चौकशी करता हजर राहण्याचे आदेश दिले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने आज कंगना आणि तिच्या बहिणीला चौकशी करता हजर राहण्याचे आदेश दिले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने आज कंगना आणि तिच्या बहिणीला चौकशी करता हजर राहण्याचे आदेश दिले होते.

मुंबई, 08 जानेवारी : राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अखेर बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) आणि तिची बहीण रंगोली चंदेल (rangoli chandel) या दोघी आपला जबाब नोंदवायला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये (Bandra police station) हजर झाल्या आहेत. 3 ते 4 वेळा नोटीस पाठवूनही कंगनाने याकडे दुर्लक्ष केले होते. पण, आज स्वत: कंगना पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली.

दुपारी साधारण 1 च्या सुमारास कंगना आणि तिची बहिण रंगोली तिच्या घरातून वांद्रे पोलीस स्टेशन करता रवाना झाल्या होत्या. 3 ते 4 वेळा नोटीस पाठवूनही कंगना चौकशीला हजर राहिली नव्हती. तर वांद्रे कोर्टाच्या आदेशाला आव्हान देत आपल्या विरोधातील गुन्हा रद्द करावा, अशी मागणी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने कंगना आणि तिच्या बहिणीला अटकेपासून सरंक्षण देवून आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आपला जबाब नोंदण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंगना आणि तिची बहीण वांद्रे पोलीस स्टेशन येथे जबाब नोंदवायला हजर आहे.

राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे अशा स्वरुपाचे गुन्हे वांद्रे पोलिसांनी कंगना विरोधात दाखल केले आहेत. कंगना आणि तिची बहिण रंगोली या दोघांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू नंतर मोठ्या प्रमाणात ट्वीट केले होते. यापैकी एका ट्विटवर आक्षेप घेत साहिल नावाच्या एका व्यक्तीने वांद्रे न्यायालयात कंगणा आणि तिच्या बहिणीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होवून न्यायालयाने कंगना विरोधात राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा नोंदवून दोघींना चौकशी करता तसंच जबाब नोंदवण्याकरता हजर राहण्याची नोटीस धाडली होती. पण कधी नातेवाईकांच्या लग्नाचे तर कधी कोविड -19 चे कारण देत कंगणा पोलीस स्टेशनच्या नोटीसीला केराची टोपली दाखवली होती आणि थेट या गुन्ह्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयाने आज कंगना आणि तिच्या बहिणीला चौकशी करता हजर राहण्याचे आदेश दिले होते.

First published: