मुंबई, 28 एप्रिल: महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) यांच्या महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) टीका करण्याची एकही संधी भाजप सोडत नाही. वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन भारतीय जनता पक्षाचे नेते ठाकरे सकरारला घेरण्याचा प्रयत्न करत असतात. सातत्याने राज्य सरकारवर टीका करणाऱ्या याच भारतीय जनता पक्षाने (BJP) आता ठाकरे सरकारचं (Thackeray Government) अभिनंदन केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत राज्य सरकारचं अभिनंदन केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये चंद्रकांत पाटील म्हणतात, "राज्यातील 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 5 कोची 71 लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन".
कोरोना संकटाशी सामना करताना केंद्र आणि राज्य सरकारला अशाच प्रकारे एकजुटीने काम करणे आवश्यक आहे.
जनतेला मी आवाहन करतो की, कोरोनाच्या या लढाईत लसीला शेवटचा उपाय न समजता मास्क आणि सोशल डिस्टेंसिंगच्या सर्व नियमांचे पालन करा. जय हिंद ! जय महाराष्ट्र !! — Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 28, 2021
एकजुटीने काम करणे आवश्यक
चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक ट्विट करत म्हटलं, "कोरोना संकटाशी सामना करताना केंद्र आणि राज्य सरकारला अशाच प्रकारे एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. जनतेला मी आवाहन करतो की, कोरोनाच्या या लढाईत लसीचा शेवटचा उपाय न समजता मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करा."
वाचा: 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
मोफत लसीकरणाचा निर्णय
राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Corona vaccine, Coronavirus