मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अखेर bharat biotech कडून Covaxin लशीची किंमत जाहीर

अखेर bharat biotech कडून Covaxin लशीची किंमत जाहीर

राज्य सरकारांसाठी कोवॅक्सिनलशी किंमत ही 600 रुपये असणार आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये...

राज्य सरकारांसाठी कोवॅक्सिनलशी किंमत ही 600 रुपये असणार आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये...

राज्य सरकारांसाठी कोवॅक्सिनलशी किंमत ही 600 रुपये असणार आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये...

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 24 एप्रिल : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर जास्त जोर दिला जात आहे. सिरम संस्थेपाठोपाठ आता भारत बायोटेकने (bharat biotech) सुद्धा आपल्या कोवॅक्सिन(Covaxin) लशीची किंमत जाहीर केली आहे. कोवॅक्सिनची किंमतही कमीत कमी 600 रुपये असणार आहे.

भारत बायोटेककडून कोवॅक्सिनलशीची किंमत अखेर जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारांसाठी कोवॅक्सिनलशी किंमत ही 600 रुपये असणार आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये याच लशीचा दर हा 1200 रुपये असणार आहे. तर परदेशात निर्यात करण्यासाठी  15 ते 20 डॉलर इतका दर राहणार आहे. तर केंद्र सरकारला हीच लस 150 रुपये दरांने दिली जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच सिरम संस्थेनं आपल्या (Covishield) लशीची किंमत जाहीर केली होती.  आता सर्व सरकारसाठी कोरोना लशीची किंमत 400 रुपयेच आहे. सुरुवातीला आम्ही केंद्र सरकारसोबत करार केला त्यानुसार कोरोना लशीची किंमत 150 रुपये होती. आता कोरोना लशीचा नवा टप्पा सुरू होणार आहे. त्यावेळी केंद्र सरकारसाठी ही किंमत 400 रुपयेच असणार आहे.

देशभरात आता 1 मे रोजीपासून 18 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. आता खासगी बाजारात सुद्धा कोरोनाची लस उपलब्ध झाल्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढणार आहेे.

First published: