मजुरांसाठी धावणाऱ्या सोनू सूदचं राज्यपालांनी केलं कौतुक, म्हणाले...

मजुरांसाठी धावणाऱ्या सोनू सूदचं राज्यपालांनी केलं कौतुक, म्हणाले...

घरी परतल्यानंतर डिलेव्हरी झालेल्या एका महिलेने आपल्या मुलाचं नाव सोनू असं ठेवलं अशी माहिती खुद्द सोनू सूदनेच दिली होती.

  • Share this:

मुंबई 30 मे: मजुरांसाठी देवदूत ठरलेल्या अभिनेते सोनू सुदने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी तसेच लाखो लोकांच्या भोजन व्यवस्थेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सूद यांनी राज्यपालांना माहिती दिली. राज्यपालांनी सूद यांचे कौतुक करून त्यांना त्यांच्या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

अभिनेता सोनू सूदनं काही दिवसांपूर्वी कर्नाटकला जाणाऱ्या मजूरांसाठी बसची सोय केली होती. त्यानंतर आता त्यानं आणखी 3 राज्यातील मजूरांच्या घरी पोहचवण्याची सोय केली आहे.

फोटो जर्नलिस्ट विरल भयानी यांनी त्यांच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर याची माहिती दिली आहे. त्यांनी सोनू सूद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तो मजूरांना बसमध्ये बसवून घरी पाठवताना आणि त्यांचा निरोप घेताना दिसत आहे. कर्नाटकच्या प्रवासी मजूरांनंतर सोनूनं उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या प्रवासी मजूरांच्या घरी जाण्याची व्यवस्था केली आहे.

केरळमध्ये अडकलेल्या ओडिशाच्या 100 पेक्षा जास्त मजुरांना तर सोनू सूदने विमानाने आपल्या राज्यात पाठवलं होतं.

सोशल मीडियावर सोनूचे खूप कौतुक देखील होत आहे. 'रिअल हिरो' म्हणून त्याला संबोधले जात आहे. सोनूच्या मदतीनेच एक महिला बिहारमधील तिच्या गावी पोहोचली. ही महिला गरोदर होती आणि तिथे पोहोचल्यानंतर एकदम अनोख्या पद्धतीने तिने सोनूचे आभार मानले आहेत.

सोनूनेच या घटनेसंदर्भात खुलासा केला आहे. बॉम्बे टाइम्सबरोबर केलेल्या चर्चेमध्ये सोनूने यासंदर्भात माहिती दिली आहे. तो असं म्हणाला की, 'मी ज्या लोकांना त्यांच्या घरी पाठवलं आणि त्यातील एका महिलेने बाळाला जन्म दिला आहे. तिने माझ्या नावावर तिच्या मुलाचं नाव ठेवलं आहे.

First published: May 30, 2020, 7:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या