Home /News /mumbai /

'Maldives मधून वसुली झाली' PHOTO शेअर करत नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केला गंभीर आरोप

'Maldives मधून वसुली झाली' PHOTO शेअर करत नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केला गंभीर आरोप

Nawab Malik serious allegation: नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

मुंबई, 21 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुनहा एकदा एनसीबीवर (NCB) निशाणा साधत समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव (Maldives) आणि दुबईमध्ये होती, त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते याचे पुरावे नवाब मलिक यांनी सादर केले आहेत. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? याचं उत्तर अपेक्षित आहे असेही नवाब मलिक म्हणाले. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. 4-4 हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री, अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले आणि दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव आणि दुबईमध्ये झालीय असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. अमेय खोपकरांचा नवाब मलिकांना थेट इशारा क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाईवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबतच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या बहिण असलेल्या जास्मिन वानखेडे यांच्यावरही आरोप केला होता. याप्रकरणी आता मनसेने नवाब मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच आपण जास्मिन वानखेडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचंही म्हटलं आहे. अमेय खोपकर यांनी म्हटलं, जास्मिन वानखेडे मनसे चित्रपट सेनेच उत्तम काम करत आहेत. जास्मिन वानखेडे आणि एनसीबी बरोबर काहीही संबंध नाही. समीर वानखेडे आणि मनसे काहीही संबंध नाही. नवाब मलिक यांना एवढं समजत नाही महिलेवर तुम्ही खालच्या पातळींवर जाऊन टीका करता. तुमचे जावई जेलमध्ये होते त्याचा राग तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांवर का काढताय? जास्मिन वानखेडे यांच्यावर केलेले आरोप धाधांद खोटे आहेत. मुंबई पोलीस आणि एनसीबी जे काम ड्रग्ज संदर्भात करत आहे. ते अत्यंत काम अभिमानास्पद करत आहे. यापुढे जास्मिन वानखेडे यांच्यावर केलेले आरोप आम्ही सहन करणार नाही असंही अमेय खोपकरांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Drug case, Nawab malik, NCB

पुढील बातम्या