चित्रपट उद्योगाचे अडीच लाख कर्मचारी संपावर

चित्रपट उद्योगाचे अडीच लाख कर्मचारी संपावर

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉयजनी अनिश्चित काळासाठी संपाची घोषणा केलीये.

  • Share this:

16 आॅगस्ट : सिनेमा आणि टेलिव्हिजनसाठी काम करणारे जवळपास अडीच लाख कर्मचारी 14 तारखेपासून संपावर गेलेत. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉयजनी अनिश्चित काळासाठी संपाची घोषणा केलीये.

फक्त आठ तासांची शिफ्ट असावी. त्यानंतरच्या अतिरिक्त कामांच्या तासांसाठी दुप्पट भत्ता.सर्व कामगार,  तंत्रज्ञ आणि कलाकारांना वेतन वाढ.कामगारांसाठी कामाच्या वेळी उत्तम जेवण, पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी अशा मागण्या संघटनेनं केल्यात.

2015मध्ये निर्मात्यांनी  मागण्या पूर्ण करण्याचं अाश्वासन दिलं होतं. पण अजूनपर्यंत मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा संघटनेनं संपाचं हत्यार उभारलंय. याचा परिणाम शूटिंग्जवर होतोय. अनेक सिनेमे आणि मालिकांची शूटिंग्ज बंद पडलीयत.

First published: August 16, 2017, 10:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading