मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /फडणवीस आणि दरेकरांविरोधात गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

फडणवीस आणि दरेकरांविरोधात गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

त्यामुळे असे प्रकार जर महाराष्ट्रामध्ये घडत असतील  येणाऱ्या काळामध्ये  कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो?

त्यामुळे असे प्रकार जर महाराष्ट्रामध्ये घडत असतील येणाऱ्या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो?

त्यामुळे असे प्रकार जर महाराष्ट्रामध्ये घडत असतील येणाऱ्या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो?

मुंबई, 19 एप्रिल : रेमडेसीवीर इंजेक्शन (remdesivir injection) पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्माच्या (brook pharma company) संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. आता राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे अॅड. विजय माने यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर दाखल करावा अशी मागणी विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये (vile parle police station) केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे अॅड. विजय माने यांनी विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दिली आहे.  'पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांवर दबाव टाकणे  आणि त्याच बरोबर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या पत्रातून केली आहे. तसंच, गृहमंत्री  दिलीप वळसे पाटील यांनाही एक पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.

फेशियल ट्रिटमेंटमुळे अभिनेत्रीच्या चेहऱ्याची भयंकर अवस्था; PHOTO पाहून बसेल शॉक

'मुंबई पोलीस यांनी विलेपार्ले या ठिकाणी रेमडेसीवीर या औषधाचा काळाबाजार होत असल्याचा  संशयावरून एका कंपनीच्या व्यवस्थापकाला चौकशीसाठी बोलावले असता, त्या ठिकाणी दोन्ही सभागृहाचे विरुद्ध पक्ष नेते त्या ठिकाणी चौकशी दरम्यान पोलिसांवर दबाव टाकून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेच्या वेळी घेतलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत आहे, असं माने यांनी या पत्रातून नमूद केले आहे.

त्यामुळे असे प्रकार जर महाराष्ट्रामध्ये घडत असतील  येणाऱ्या काळामध्ये  कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो? त्यामुळे ज्यांनी  पोलीस तपास अडथळा निर्माण करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरती गुन्हा नोंद करून  कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai police