मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात तीन फायटर रोबो सामील

मुंबईत आता आग विझवण्याचं काम रोबो करणार आहेत. मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात तीन नव्या रोबो फायर फायटर्सचा समावेश होणार आहे. नव्या वर्षात हे तीन नवे रोबो मुंबईत दाखल होतील.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 27, 2017 03:52 PM IST

मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात तीन फायटर रोबो सामील

27 डिसेंबर : मुंबईत आता आग विझवण्याचं काम रोबो करणार आहेत. मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात तीन नव्या रोबो फायर फायटर्सचा समावेश होणार आहे. नव्या वर्षात हे तीन नवे रोबो मुंबईत दाखल होतील.

आग लागलेल्या ठिकाणी फायर फायटर्स जाणं धोकादायक असेल तिथं हे रोबो आग विझवण्याचं काम करणार आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांची एक प्रकारे ढाल म्हणून हे रोबो काम करणार आहेत. भारतात पहिल्यांदाच फायर फायटर रोबो आणले जातायत. त्याचा पहिला वापर मुंबई फायर ब्रिगेडमध्ये होणार आहे.

कसे आहेत फायटर रोबो?

- रोबो आर्मीतल्या रणगाड्या सारखा दिसतो

- रोबोची किंमत सुमारे १ कोटी रुपये

Loading...

- प्रत्येक रोबोचं वजन सुमारे ४०० ते ५०० किलो

- रोबोतील थर्मल कॅमेरा धुरातही सर्व स्पष्ट दाखवेल

- उष्ण तापमानात रोबो स्वत:चं संरक्षण करेल

- रोबो बॅटरीवर चालतील

- पाण्याचे पाईप ओढणे, आग विझवणे, अडथळे दूर करेल

- सध्या ईस्त्रायल, चीन, अमेरिका असे रोबो तयार करते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2017 03:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...