मुंबई, 30 जानेवारी : मुंबईत Bhabha Atomic Research Centre (BARC) मधील एका वैज्ञानिक अधिकाऱ्याने कथित स्वरुपात पत्नीसोबत वाद झाल्यानंतर उपनगरातील ट्रॉम्बे येथील आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, ही घटना गुरुवारची असून मृताचं नाव अनुज त्रिपाठी आहे.
ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सिद्धेश्वर गोवे यांनी सांगितलं की, गुरुवारी सकाळी त्रिपाठी यांचं अणुशक्तीनगरस्थित आपल्या घऱी पत्नीसोबत मुलांला जेवण भरवण्यावरुन खूप भांडण झालं होतं. त्यानंतर काही वेळाने ते बेडरुणमध्ये टॉवेलच्या सहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसले.
हे ही वाचा-Online Fraud मध्ये बँकेतून 10 लाख रुपये झाले गायब;हुशारीमुळे सर्व रक्कम क्रेडिट
डॉक्टरांनी वाचवू शकले नाही
गोवे यांनी सांगितलं की, त्रिपाठी यांची पत्नी आणि शेजारी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात याबाबत प्रकरण दाखल करण्यात आलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
कोरोनाच्या कहराबरोबरच देशात मानसिक आजाराबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूत या अभिनेत्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची बाब समोर आली होती. या प्रकरणानंतर देशात अनेक आत्महत्येच्या घटना समोर आल्या. ज्यामुळे अख्खं बॉलिवूड ढवळून निघालं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai police, Research, Sucide