राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावरून रावते आणि तावडेंमध्ये खडाजंगी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावरून रावते आणि तावडेंमध्ये खडाजंगी

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट : सातवा वेतन लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी 3 दिवसांच्या संपावर गेले आहेत. त्याचे तीव्र पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटताना दिसले. या संपाच्या मुद्द्यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात मोठी खडाजंगी रंगली. संपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना संपकरी करणाऱ्यांवर कारवाई करणार अशी भूमिका दिवाकर यांनी घेतली तर आपल्या मागण्य़ांसाठी संप करणं हा त्यांचा हक्क असल्याची भूमिका विनोद तावडे यांनी घेतली. याच्यावर या दोघांमघ्ये खडाजंगी झाली.

सरकारी कर्मचारी संघटनेत 5 लाख सरकारी, अडीच लाख जिल्हा परिषद, 7 लाख शिक्षक, नगर पालिका आणि महापालिका असे एकूण 17 लाख कर्मचारी संपावर गेले आहेत.  अशी माहिती राज्य कर्मचारी संघटनेचे अविनाश दौंड यांनी दिली आहे. राज्य सरकार कर्मचारी मध्यवर्ती संघटनानी पुकारलेल्या संपानंतर आज काही कर्मचारी यांनी मंत्रालय गार्डन गेट येथे काम बंद पुकारले आहे. अनेक शासकीय कर्मचारी यांना संघटनाचे लोक थांबवले जात आहे.

खासदार साहेब, माझ्यावरचा गुन्हा मागे घ्या नाहीतर मी जीव देईन

संपात क्लास वन टू अधिकारी सहभागी नाहीत, दुसरीकडे क्लास थ्री फोर अधिकारी मात्र संपात सहभागी झाले आहेत. संप पुकारला असला तरी काही कर्मचारी कारवाई होऊ नये म्हणून काम करण्यासाठी सहभागी होत आहे.

राज्य सरकारच्या काही कर्मचारी संघटना संप पुकारलाचा परिणाम म्हणजे मंत्रालयातील कॅन्टीन बंद पडलेले आहे. राज्य सरकाराचे काही कर्मचारी संपात सहभागी झाल्याने क्लार्क, पिऊन सारखे कर्मचारी कामावर नाहीत.

हेही वाचा...

VIDEO : आता चिमुकलेही मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर

डोक्यावरून गेला ऑईल टँकर, तरुणाचा जागीच मृत्यू

सावधान ! मुंबईतील चायनीज गाड्यांवरील चिकन रोगटलेल्या, मेलेल्या कोंबड्यांचं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2018 01:28 PM IST

ताज्या बातम्या