मुंबई 03 एप्रिल : देशात कोरोनाचा सगळ्यात जास्त कहर महाराष्ट्रात आणि मुंबईत दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार झपाटून कामाला लागलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकांवर बैठका घेत परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यांच हे रूप महाराष्ट्राला नवीन आहे. आत्तापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख म्हणूनच ते महाराष्ट्राला माहित होते. त्यांचा कामाचा उरक पाहून सगळ्याच स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे. अभिनेता शाहरुख खाननेही उद्धव ठाकरे हे अविश्रांत परिश्रम घेत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शाहरुख आणि गौरी खान यांचे आभार मानले होते. त्यानंतर शहारूखने मराठीत उत्तर देत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
ते म्हणाला, ह्या लढाईत आपण सगळे एकत्र आहोत कारण थेंबे थेंबे तळे साचे. सर्वांनी थोडे थोडे प्रयत्न केले तर एक मदतीचा महासागर तयार होईल.. आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद! त्याच्या या मराठी ट्वीटचं चाहत्यांनीही कौतुक केलं आहे.
देशात कोरोनाव्हायरसचा धोका आणखी वाढला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. देशभरात गेल्या 24 तासांत Coronavirus मुळे 12 मृत्यू झाले आणि 336 नवे कोरोनाग्रस्त दाखल झाले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाते अधिकारी लव अग्रवाल यांनी शुक्रवारी दिली. देशात कोरोनाबळींची संख्या 56 झाली आहे.
दिल्लीच्या निजामुद्दीन इथे झालेली तबलिगी मरकज देशाभरात कोरोनाव्हायरचा हॉटस्पॉट ठरली आहे. या संमेलनात सहभागी झालेले अनुयायी तिथून देशभर हा संसर्ग घेऊन गेले आणि आता अनेक राज्यांमधून या तबलिगी अनुयायांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट होत आहे.
ह्या लढाईत आपण सगळे एकत्र आहोत कारण थेंबे थेंबे तळे साचे. सर्वांनी थोडे थोडे प्रयत्न केले तर एक मदतीचा महासागर तयार होईल..
आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद!
We are all a family sir....and we need to be together to keep each other healthy. Thank you. https://t.co/Yi2iFgktPZ
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 3, 2020
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 14 राज्यांमध्ये तबलिगी जमातशी संबंधित 647 कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. हा आकडा गेल्या दोन दिवसातला आहे. या नव्या कोरोनाग्रस्तांमुळे देशातल्या कोरोनाग्रस्तांची संख्याही एकदम वाढली आहे.