भिवंडी 23 मार्च :करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असं असतानाही भिवंडी शहरातील मशिदीत दुपारी नमाज पठाणासाठी गर्दी जमली होती. त्यामुळे मनाई आदेशाचा भंग केल्या प्रकरणी भिवंडी शहरातील आसबीबी मशिदीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारी म्हणून सर्वच धर्माच्या धार्मिक स्थळांना बंद करण्यात आलं आहे.
आसबीबी मशिदीचे अध्यक्ष गुलाम अहमद खान, खजिनदार मरगुब हसन अन्सारी, सदस्य मोहम्मद हबीब अन्सारी, हजरत अली अन्सारी व इतर विश्वस्त यांच्या विरोधात फौजदारी दंड प्रक्रिया 144 (1) (3) प्रमाणे भादवी कलम 188, 269 सह राष्ट्रीय आपत्ती उल्लंघन कायदा 2005 चे कलम 51 ब प्रमाणे मनाई आदेशाचा भंगकेल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी माहिती दिली आहे की सध्या जमावबंदी आदेश लागू असल्याने सर्व मंदिरं, मशिदीमध्ये गर्दी जमवू नये असे समक्ष बोलावून सांगितले असून मस्जिद मधून फक्त नमाज पठणाची वेळ झाली याची माहिती दिली जावी. यासाठी फक्त अजान देण्याचे सांगण्यात आले असून नागरीकांनी घरामध्येच नमाज पठण करावं अशी विनंती करण्यात आली होती.
हे वाचा - चंद्रपुरातील क्वारंटाइनच्या हातावर जीपीएस बेल्ट, जिल्हा प्रशासनाचा जालीम उपाय
असे असतानाही मस्जिदमध्ये नमाजासाठी गर्दी जमविल्या प्रकरणी ही पोलीस कारवाई असल्याचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
हे वाचा...Coronavirus पश्चिम महाराष्ट्रात पसरला, 8 नव्या रुग्णांसह संख्या 97 वरकोरोनाचा असाही धसका, गावकऱ्यांनी थेट रस्त्यावर भलंमोठं झाड टाकून बंद केला रस्ता!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.