घाटकोपर इमारत दुर्घटनेत पालिका अधिकारीही दोषी !

घाटकोपर इमारत दुर्घटनेत पालिका अधिकारीही दोषी !

काल विधानसभेत झालेल्या चर्चेतूनही काही अधिकारी शितपला अनधिकृत पद्धतीने परवानग्या मिळवून देत होते असे आरोप लावण्यात आलेत.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : घाटकोपर इमारत दुर्घटनेत सुनील शितप पाठोपाठ मुंबई महापालिकेचे एन वार्डचे काही अधिकारी संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. शितपप्रकरणी काही अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.

काल विधानसभेत झालेल्या चर्चेतूनही काही अधिकारी शितपला अनधिकृत पद्धतीने परवानग्या मिळवून देत होते असे आरोप लावण्यात आलेत. दिनेश कर्णिक (क्लार्क, विधी खातं , मुंबई महापालिका), विशाल साखरकर (सहअभियंता , बिल्डींग अॅण्ड फॅक्टरी , मुंबई महापालिका), बाळकृष्ण साळे (नियुक्त अधिकारी , बिल्डींग अॅण्ड फॅक्टरी), सुधांशू द्विवेदी (वॉर्ड प्रभारी) आणि कल्पना कोतवाल (कनिष्ठ अभियंता , देखभाल विभाग ,एन वॉर्ड मुंबई महापालिका) चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

याप्रकरणी बुधवारी विधानसभेत झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका अधिकाऱ्यांबाबत सभागृहाला निवेदन दिलं आहे. त्यात त्यांनी सुनील सितपला मदत करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांची नावं उघड केली.

First published: July 27, 2017, 1:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading